अबुधाबी : इंग्लिश महिला क्रिकेट संघाची माजी विकेटकीपर-फलंदाज सारा टेलरने इतिहास रचला आहे. फ्रेंचायझी क्रिकेट संघाची ती पहिली महिला प्रशिक्षक ठरली आहे.
साराला या संघाची जबाबदारी
अबुधाबी T10 लीग 19 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. सारा टेलरला अबुधाबी संघाची सहाय्यक प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. मुख्य प्रशिक्षक पॉल फारब्रेस आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुसनर यांच्यासोबत ती संघाची जबाबदारी सांभाळणार आहे.
साराने व्यक्त केला आनंद
सारा टेलरने याबद्दल आनंद व्यक्त केला आहे, तिने अबूधाबी संघाच्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, 'जेव्हा तुम्ही फ्रँचायझी जगात येतो तेव्हा तुम्हाला जगभरातील खेळाडू आणि प्रशिक्षकांना भेटण्याची संधी मिळते, जी सामान्य नाही.'
'साराच्या येण्याने संघ मजबूत होईल'
शेन अँडरसन म्हणाले की, "सारा संघाला जबरदस्त आंतरराष्ट्रीय अनुभव आणि ज्ञान प्रदान करू शकते आणि तिची नियुक्ती आमची सांघिक संस्कृती सुधारण्याच्या आणि यशाचा मजबूत पाया तयार करण्याच्या आमच्या आशांना समर्थन देईल.'