मुंबई : ICC T20 world cup 2021 मध्ये वेस्ट इंडिज आणि बांगलादेश (WI Vs Ban) यांच्यातील सामन्यादरम्यान, शारजाह क्रिकेट स्टेडियमवर असे काही घडले की चाहत्यांना हसू आवरले नाही.
13व्या षटकात हाय व्होल्टेज ड्रामा
वेस्ट इंडिजच्या डावात बांगलादेशसाठी 13वे षटक टाकण्याची जबाबदारी तस्किन अहमदकडे आली. या षटकात खूप नाट्य घडले, तिसऱ्या चेंडूवर किरॉन पोलार्ड दुखापतग्रस्त झाला.
जेव्हा तस्किन अहमदने 13व्या षटकातील चौथा चेंडू टाकला तेव्हा रोस्टन चेसने समोरून एक शॉट खेळला, चेंडू नॉन-स्ट्रायकर एंडवर स्टंपला लागला, तोपर्यंत आंद्रे रसेलने क्रीझ सोडली होती. त्यामुळे अंपायरने त्याला आऊट घोषित केले.
Andre Russell has just been run out backing up at the non-striker’s end for a diamond duck #T20WorldCup #WIvBAN pic.twitter.com/5WO6kLnHGN
— Wisden (@WisdenCricket) October 29, 2021
रसेलचा व्हिडिओ व्हायरल
एकही चेंडू न खेळता वैयक्तिक शून्य धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतल्याने वेस्ट इंडिजचा फलंदाज आंद्रे रसेल पहिला खेळाडू ठरला. 22 यार्डच्या खेळपट्टीवर घडलेले हे सर्व नाट्य कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वेस्ट इंडिजचा विजय
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 142 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशच्या संघाला 20 षटकांत 5 गडी गमावून केवळ 139 धावा करता आल्या आणि कॅरेबियन आर्मीने 3 धावांनी सामना जिंकला. निकोलस पूरनला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी (40 धावा, 22 चेंडू) 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला.