मुंबई : लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सवर 18 रन्सने मात केली. मुंबईचा या सिझनमधील हा सलग 6 वा पराभव ठरला. या पराभवामुळे मुंबईच्या प्लेऑफच्या आशाही जणू संप संपल्या आहेत. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात मुंबईने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्हीमध्ये निराशाजनक कामगिरी केली. मात्र यानंतर आता नेटीझन्सचं मास्टर ब्लास्टर तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला संधी द्यावी असं म्हटलं आहे.
आगामी सामन्यात सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला संधी मिळण्याची शक्यता आहे. लखनऊविरूद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईच्या फ्रेंचायझीने यासंदर्भातील संकेत दिलीये. मुंबई इंडियन्सने एक ट्विट केलं असून त्याला खुद्द अर्जुनची बहिण सारा तेंडुलकरनेही प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईच्या फ्रेंचायझीने केलेल्या ट्विटमध्ये अर्जुनच्या नावासह म्हटलंय की, येणाऱ्या सामन्यात आमच्या डोक्यात असा प्लान चालू आहे. या पोस्टवर अर्जुनची बहिण सारानेही कमेंट केलीये. जी कमेंट फार व्हायरल होतेय.
मुंबई इंडियन्सच्या या ट्विटवर साराने कमेंट करत 10 वेळा निळ्या रंगाचं हार्ट इमोजी पोस्ट केलं आहे. याचा अर्थ भावाचा डेब्यू पाहण्यासाठी सारा तेंडुलकरही उत्सुक असल्याचं समजतंय.
अर्जुनला गेल्या आणि या मोसमातही मुंबईच्या गोटात आहे. मुंबईने त्याला गेल्या हंगामात 20 तर यावेळेस 30 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र त्याला अजून डेब्यूची संधी दिलेली नाही.