Sara Tendulkar : सारा भाभी जैसी...; Shubman Gill ला पाहताच प्रेक्षकांनी घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल

शुभमनच नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं. सारा आणि शुभमन यांचं अफेअर असल्याची कथित चर्चा आहे

Updated: Mar 2, 2023, 08:10 PM IST
Sara Tendulkar : सारा भाभी जैसी...; Shubman Gill ला पाहताच प्रेक्षकांनी घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल title=

Shubman Gill : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज शुभमन गिलच्या (Shubman Gill) पर्सनल लाईफच्या खूप चर्चा रंगल्या आहेत. गिलचं नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हिच्याशी जोडलं जातं. इतकंच नाही तर चाहत्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते शुभमनला साराच्या नावाने चिडवायची एक संधी सोडत नाहीत. नुकतंच ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात देखील चाहत्यांनी स्टेडियममधून त्याला चिडवलं आणि याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

स्टेडियममध्ये चाहत्यांनी शुभमनला चिडवलं

इंदूरच्या टेस्ट सामन्यात स्टेडियममध्ये असलेले प्रेक्षक शुभमनला साराच्या नावाने चिडवत असल्याची जोरदार चर्चा रंगली. ऑस्ट्रेलियाची टीम फलंदाजी करत असताना ही गोष्ट घडली. यावेळी गिल बाऊंड्री जवळ फिल्डींग करत होता. यावेळी त्याला पाहून प्रेक्षक “हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो।” असे ओरडू लागले. इतकंच नाही तर साराच्या नावाने चिडवल्यानंतर लगेचच गिलने उस्मान ख्वाजाचा एक उत्तम कॅच पडला. 

सारा आणि गिलच्या अफेअरची चर्चा

शुभमनच नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं. सारा आणि शुभमन यांचं अफेअर असल्याची कथित चर्चा आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार, सारा आणि गिल यांच्यात प्रेम संबंध आहेत. मात्र अजून याची अधिकृतरित्या कोणीही घोषणा केली नाही.

तिसऱ्या टेस्ट सामन्यात शुभमन गिल फेल

दिल्ली आणि नागपूर टेस्टमध्ये शुभमनला संधी देण्यात आली नव्हती. या दोन सामन्यांमध्ये केएल राहुलची फ्लॉप कामगिरी पाहून तिसर्‍या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शुभमन गिलचा समावेश केला गेला. मात्र मिळालेल्या या संधीचं सोनं करण्यात गिल अपयशी ठरला. गिलने पहिल्या डावात 21 रन्स तर दुसऱ्या डावात तो केवळ ५ रन्स करू शकला. त्यामुळे आता गिलला चौथ्या टेस्टमध्ये संधी मिळणार का हे पहावं लागणार आहे.

दुसऱ्या डावात टीम इंडियासाठी कर्दनकाळ बनला नॅथन लिऑन 

तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या लंच ब्रेकपूर्वी टीम इंडियाने (IND vs AUS) दुसऱ्या डावाच्या खेळाला सुरुवात केली होती. यावेळी लंचपर्यंत 13 नाबाद असा स्कोर भारताचा होता. मात्र लंचनंतर टीम इंडियाचा खेळ काही चांगला झालेला दिसला नाही. चहापानापर्यंत टीम इंडियाने महत्त्वाचे विकेट्स गमावले होते. या सेशनमध्ये कांगारूंचा स्पिनर लिऑन भारतासाठी भारी पडला. लिऑनने कर्णधार रोहित शर्मा (12) शुभमन गिल (5) आणि रवींद्र जडेजा (7) हे महत्त्वाचे विकेट्स पटकावले होते. यावेळी तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेतेश्वर पुजाराने एका बाजूने भारताचा मोर्चा सांभाळून धरला. त्याने शानदार अर्धशतक झळकावत 59 रन्सची खेळी केली.

इंदूरच्या मैदानावर पुन्हा एकदा लिऑन नावाचं वादळ आलं आणि भरत (3), अश्विन (16) आणि उमेश (0) यांची विकेट घेत टीम इंडियाला कमकुवत केलं. याशिवाय त्याने एका बाजूला डटून उभा असलेल्या चेतेश्वर पुजाराचाही काट काढला. नॅथनच्या गोलंदाजीवर स्टिव्ह स्मिथकडे कॅच देऊन 59 रन्सवर पुजारा पव्हेलियनमध्ये परतला. यानंतर यादवनंतर मोहम्मद सिराजला बोल्ड करत 8 विकेट्स घेण्यात यशस्वी झाला.