VIDEO:सपना चौधरीबरोबर दिग्गज क्रिकेटपटूच्या वडिलांचा डान्स

हरियाणवी डान्सर सपना चौधरी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर चर्चेमध्ये आहे.

Updated: Aug 15, 2018, 06:13 PM IST
VIDEO:सपना चौधरीबरोबर दिग्गज क्रिकेटपटूच्या वडिलांचा डान्स title=

मुंबई : हरियाणवी डान्सर सपना चौधरी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर चर्चेमध्ये आहे. सपना चौधरीचं पंजाबी गाणं 'बिल्लोरी अंख' व्हायरल होत आहे. या गाण्याला युट्यूबवर बरेच व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यामध्ये युवराज सिंगचे वडिल योगराज सिंगही नाचताना दिसत आहेत. युवराजचे वडिल योगराज सिंग हेदेखील माजी क्रिकेटपटू आणि पंजाबमधले लोकप्रिय अभिनेते आहेत. योगराज सिंग यांनी टीव्ही सीरियलमध्येही काम केलं आहे.

याआधी सपना चौधरीनं बॉलीवूडमध्येही आयटम साँगही केलं आहे. वीरे दी वेडिंग चित्रपटातल्या हट जा ताऊ या गाण्यातही सपना चौधरी झळकली होती. बॉलीवूडबरोबरच भोजपुरी, पंजाबी चित्रपटांमध्ये सपना चौधरीनं आयट साँग केली आहेत.

काही दिवसांपूर्वी बैरी कंगना २ हा चित्रपट रिलीज झाला होता. यामध्येही सपना चौधरीचं एक गाणं होतं. सपनानं अभय देओलचा चित्रपट नानू की जानूमधल्या गाण्यावरही डान्स केला होता.