T20 WC साठी टीम जाहीर झाल्यानंतर संजू सॅमसनची खास पोस्ट; पोस्टचा रोख नेमका कोणाकडे?

 टी-20 वर्ल्डकपच्या टीममध्ये त्याला स्थान मिळालं नाही

Updated: Sep 14, 2022, 11:08 AM IST
T20 WC साठी टीम जाहीर झाल्यानंतर संजू सॅमसनची खास पोस्ट; पोस्टचा रोख नेमका कोणाकडे? title=

मुंबई : 2022 च्या T20 वर्ल्डकपसाठी इंडिया टीम जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 15 खेळाडू आणि 4 स्टँडबाय खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे, मात्र एका खेळाडूच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरलीये. हा खेळाडू म्हणजे संजू सॅमसनला पुन्हा एकदा दुर्लक्षित करण्यात आलं आणि टी-20 वर्ल्डकपच्या टीममध्ये त्याला स्थान मिळालं नाही.

सोमवारी संध्याकाळी जेव्हा T20 वर्ल्डकप टीमची घोषणा झाली, तेव्हा संजू सॅमसनची एक पोस्टही समोर आली. संजूने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो डोकं खाली ठेऊन फोन ऑपरेट करताना दिसतोय. संजू सॅमसनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संजू सॅमसनचे चाहते संतापले

आयपीएल 2022 मधील दमदार कामगिरीमुळे संजू सॅमसनला टीम इंडियामध्ये सामील करण्याची मागणी होत होती. त्याला काही सिरीजमध्ये संधीही मिळाली, पण तो टीमचा भाग नव्हता. संजू सॅमसनचे चाहते अनेकदा सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करतात.

T20 वर्ल्डकपसाठी टीमची घोषणा झाल्यानंतर ट्विटरवर संजू सॅमसनबद्दलचे संदेश ट्विटरवर शेअर करण्यात आलेत. चाहत्यांनी लिहिलंय की, संजू सॅमसन बीसीसीआयच्या राजकारणाचा बळी ठरतोय. काही लोकांनी म्हटलंय की, संजू सॅमसन फक्त बीसीसीआयमुळे टी-20 वर्ल्ड कपचा भाग नाही.

संजू सॅमसनचा T20 मधील रेकॉर्ड

संजू सॅमसनने टीम इंडियासाठी फक्त 16 टी-20 सामने खेळलेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 296 रन्स आहेत आणि त्याची सरासरी 21 आहे. संजू सॅमसनने 2015 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केलं होतं, तर शेवटचा टी-20 सामना ऑगस्टमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध होता.

विशेष म्हणजे T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाने दोन विकेटकीपर घेतले. यामध्ये ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांचा समावेश असून, प्लेइंग-11 मध्ये कोणाला स्थान मिळतं हे पाहावं लागणार आहे. कारण टीम इंडियाकडे एकही डावखुरा फलंदाज नाही, अशा स्थितीत ऋषभ पंतलाही प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळू शकतं.