PICS : जहीर - सागरिकाचे अनोखे सेलिब्रेशन

भारताचा माजी फास्ट बॉलर जहीर खानने २३ नोव्हेंबर रोजी 'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री सागरिका घाटगे सोबत विवाह केलाय. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 27, 2017, 01:31 PM IST
PICS : जहीर - सागरिकाचे अनोखे सेलिब्रेशन  title=

मुंबई : भारताचा माजी फास्ट बॉलर जहीर खानने २३ नोव्हेंबर रोजी 'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री सागरिका घाटगे सोबत विवाह केलाय. 

या दोघांनी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी रजिस्टर मॅरेज केलं असून त्यामध्ये त्यांचे कुटुंबिय आणि अगदी जवळचा मित्र परिवार उपस्थित होता. या दोघांनी लग्नाच्या रात्री आपल्या मित्र परिवारासोबत पार्टी एन्जॉय केली आहे. जहीर - सागरिकाच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन मुंबईतील ताज महल पॅलेसमध्ये आज २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्या अगोदरच्या रात्री या दोघांनी पुन्हा एकदा आपल्या मित्र परिवारासोबत जंगी पार्टी केली आहे. 

असं होतं खास सेलिब्रेशन 

२३ तारखेपासून हे दोघेही आपल्या लग्न अनोख्या पद्धतीने साजरे करत आहे. गुरूवारच्या संध्याकाळी पार्टी नंतर शनिवारी देखील एक डान्स पार्टी झाली. जहीर - सागरिकाच्या या लग्न सोहळ्याच्या पार्टीत क्रिकेट, खेळ आणि बॉलिवूड जगतातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

जरी या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं असलं तरीही लग्ना अगोदरच्या सर्व पद्धती हे दोघे आता साजरे करत आहेत. जसं की रविवारी या दोघांनी मेहंदीचा कार्यक्रम साजरा केला. या प्रोग्रामसाठी सागरिकाने हिरव्या रंगाचा लेहंगा घातला होता तर जहीर खान निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसला. मेहंदीच्या या फंक्शनमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली तसेच युवराज सिंह आणि पत्नी हेजल कीज देखील उपस्थित होते. 

Zaheer Khan, Sagarika Ghatge

Zaheer Khan, Sagarika Ghatge

Zaheer Khan, Sagarika Ghatge

Zaheer Khan, Sagarika Ghatge

Zaheer Khan, Sagarika Ghatge

Zaheer Khan, Sagarika Ghatge

Zaheer Khan, Sagarika Ghatge

Zaheer Khan, Sagarika Ghatge

Zaheer Khan, Sagarika Ghatge

तसेच यावेळी सागरिकाची सर्वात जवळची मैत्रिण आणि चक दे इंडियातील तिची सहकलाकार विद्या मालवदेने ट्विटरवर सर्वात अगोदर या दोघांचा खास फोटो शेअर केला. जहीर - सागरिकाला भरपूर लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे. 

जहीर खानने ऑक्टोबर २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. त्याने ९२ टेस्ट सामना खेळून ३११ आणि २०० वन डेमध्ये २८२ विकेट घेतल्या आहेत. 

(यामधील सर्व फोटो हे India.com आणि इंस्टाग्रामवरून घेण्यात आले आहेत)