फूटबॉल वर्ल्ड कपमध्ये प्रेमाचाही डाव!

रशियात सध्या फुटबॉल विश्वचषक रंगला असल्यानं जभरातील फुटबॉलप्रेमी आणि नागरिक रशियात दाखल झाले आहेत.

Updated: Jun 20, 2018, 08:40 PM IST
फूटबॉल वर्ल्ड कपमध्ये प्रेमाचाही डाव! title=

मॉस्को : रशियात सध्या फुटबॉल विश्वचषक रंगला असल्यानं जभरातील फुटबॉलप्रेमी आणि नागरिक रशियात दाखल झाले आहेत. विश्वचषकात फुटबॉल सामन्यांचा आनंद लुटण्याबरोबरच काहीजण प्रेमाचा डावही खेळत आहेत. विश्वचषकात फुटबॉल चाहत्यांना दररोज तीन-तीन सामन्यांची मेजवानी मिळत आहे. तरीही उर्वरित वेळेत करायचं काय हा प्रश्न चाहत्यांसमोर आहे. मग अनेकजण सुंदर रशियन मुलींशी प्रेमाचा डाव खेळत आहेत.

या फुटबॉल विश्वचषकादरम्यान आपल्यावर खरंखुरं प्रेम करणारी व्यक्ती मिळेलं असा विश्वास काही चाहत्यांना वाटतोय. विश्वचषकात डेटींग साईट्सचा यासाठी वापर केला जातोय. विश्वचषकाच्या निमित्तानं रशियात अनेक देखणे तरुण पर्यटक आले आहेत.

हे तरुण फुटबॉल खेळाचा आनंद लुटण्याबरोबरच मुलींबरोबर डेटींग करण्यात दंग आहेत. रशियातील अनेक मुलींना इंग्रजी आणि स्पॅनिश भाषा फार कळत नसल्यानं संवाद साधताना त्यांना भाषेची खूप मोठी अडचण जाणवतं आहे. भाषेची अडचण ठरु नये यासाठी काही रशियन मुली इंग्रजीचे धडेही घेत आहेत.

विश्वचषकाच्या सलामीच्या पूर्वसंध्येला तमारा प्लेतेनेव्हा या मंत्र्यानं रशियन मुलींना विश्वचषकाच्या निमित्तानं रशियात येणाऱ्या पर्यटकांपासून दूर रहाण्याचा सल्ला दिलाय. तर तमारा यांच्या अगदी विरुद्ध रशियातील खासदार मिखाईल देग्तीरियोव्हनं विश्वचषकाच्या निमित्तानं इथे बऱ्याच प्रेमकथा बघायला मिळतील हे चांगलेच आहे असं मत व्यक्त केलं आहे. एकूणच रशियात विश्वचषकाच्या रोमांचक मुकाबल्यांबरोबरच रोमांसही पहायला मिळत आहे.