रश्मिका मंदानासोबत सिनेमामध्ये झळकणार Rohit Sharma; फिल्म डेब्यूसाठी कर्णधार तयार

या चित्रपटात रोहित महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Updated: Sep 2, 2022, 10:11 AM IST
रश्मिका मंदानासोबत सिनेमामध्ये झळकणार Rohit Sharma; फिल्म डेब्यूसाठी कर्णधार तयार title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा लवकरच क्रिकेटच्या पीचनंतर आता सिनेमाच्या पीचवर दिसणार आहे. रोहित शर्माने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिलीये. रोहित शर्माच्या या चित्रपटाचं नाव 'मेगा ब्लॉकबस्टर' आहे. या चित्रपटाची निर्मिती OSHEEM करणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात रोहित महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 4 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्टर पोस्ट 

भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून मेगा ब्लॉकबस्टर या डेब्यू चित्रपटाचं पोस्टर शेअर केलंय. त्याने या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, नर्वस वाटतंय, हे एक वेगळं पदार्पण आहे. खरंतर, रोहित शर्मा पहिल्यांदाच चित्रपटात दिसणार आहे. ओशिम प्रॉडक्शन रोहित शर्माचा मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट घेऊन येतोय.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त, माजी भारतीय कर्णधार, अनुभवी फलंदाज आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली देखील मेगा ब्लॉकबस्टरमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सौरव गांगुलीनेही या चित्रपटाच्या पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. 

सौरव गांगुली आणि रोहित शर्मासारख्या स्टार्सनी भरलेला हा चित्रपट क्रिकेट चाहत्यांचं भरपूर मनोरंजन करणार आहे. सर्व चाहते त्याच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत.

आशिया चषकात टीम इंडियाची कमाल

टीम इंडियाने आशिया चषक स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगचा 40 रन्सने पराभव केला. या विजयासह टीम इंडिया आशिया कप 2022 मध्ये सलग दोन सामने जिंकून टॉप 4 मध्ये पोहोचली आहे. आशिया कप 2022 च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता.