Rohit sharma : मोहालीच्या मैदानावर आज पंजाब किंग्स (Punja Kings) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात सामना रंगलाय. पंजाब विरूद्ध मुंबई (PBKS vs MI) यांच्यात पहिल्या झालेल्या सामन्यात पंजाबने मुंबईवर 13 रन्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकून मुंबईच्या टीमला बदला घेण्याची संधी आहे. अशातच टॉस मुंबईने जिंकला (Mumbai Indians won the toss) असून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. मात्र यावेळी एक मोठी घटना घडली ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सामान्यपणे टॉस होण्यापूर्वी कर्णधार टीमशी आणि कोचशी बोलून, काय निर्णय घ्यायचा हे ठरवतात. मात्र पंजाब विरूद्ध मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी काहीसं वेगळं चित्र पहायला मिळालं. यावेळी टॉस जिंकल्यानंत रोहित शर्माने (Rohit sharma) शिखर धनवला (Shikhar Dhawan) विचारून टॉसचा निर्णय घेतला.
टॉस जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, "मी शिखरला विचारलं होतं की, काय करायचं आहे. यावेळी त्याने मला सांगितलं की, पहिल्यांदा गोलंदाजी करा. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोत." आणि खरंच रोहितने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
टॉस वेळी रोहित शर्मा म्हणाला की, "मोहालीचं पीच चांगलं आहे. अशा पीचवर नेहमी तुम्ही लक्ष समोर असेल, असं पाहता. आम्ही खूप सामने खेळले अजून गोष्टी कधीही बदलू शकतात, त्यामुळे संतुलन ठेवणं फार गरजेचं आहे. एक टीम म्हणून आम्हाला काय केलं पाहिजे, यावर लक्ष देणं गरजेचं आहे." दुसरीकडे आजच्याही सामन्यात अर्जुन तेंडुलकरला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आलेली नाही.
Mumbai Indians have won the toss and elect to bowl first against Punjab Kings.
Live - https://t.co/IPLsfnImuP #TATAIPL #PBKSvMI #IPL2023 pic.twitter.com/QXPqPg1XhM
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2023
आयपीएलमध्ये यापूर्वीही पंजाब विरूद्ध मुंबई यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पंजाबने मुंबईच्या गोलंदाजांची दुलाई करत 214 रन्सचं टार्गेट दिलं होतं. यावेळी मुंबईला केवळ 201 रन्सचा टप्पा गाठता आला होता. त्यावेळी पंजाबने 13 रन्सने मुंबईवर वानखेडेच्या स्टेडियममध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकून मुंबई पराभवाचा बदला घेणार का हे पाहावं लागणार आहे.
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, तिलक वर्मा, टिम डेविड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अरशद खान
पंजाब किंग्स: प्रभसिमरन सिंह, शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत बराड़, ऋषि धवन, राहुल चाहर, अर्शदीप सिंह