Rohit Sharma बाबत BCCI घेणार कठोर निर्णय; आता खैर नाही!

Rohit Sharma: भारतीय वरिष्ठ पुरुषांच्या संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा होते. त्यांच्यासह संपूर्ण समिती सदस्यांना बीसीसीआयकडून काढून टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे. 

Updated: Nov 19, 2022, 11:16 AM IST
Rohit Sharma बाबत BCCI घेणार कठोर निर्णय; आता खैर नाही! title=
rohit sharma t20 captaincy in danger bcci t20 world cup 2022

Rohit Sharma Lose T20 Captaincy: अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या टी-20 विश्वचषक 2022 (World Cup 2022) च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा (Team India) इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव झाला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) संघाला इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वावर अनेक प्रश्न देखील उभे राहत आहे. याचदरम्यान भारतीय वरिष्ठ पुरुषांच्या संघाच्या निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा होते. त्यांच्यासह संपूर्ण समिती सदस्यांना बीसीसीआयकडून काढून टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे. 

चार सदस्यीय वरिष्ठ निवड समितीची हकालपट्टी 

टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022 ) टीम इंडियाची कामगिरी काही खास नव्हती. तसेच उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने टीम इंडिया (team India) विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडली. त्यातच आता बीसीसीआयने (BCCI) शुक्रवारी (19 नोव्हेंबर) मोठा निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आतापर्यंत बोर्डाने चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय वरिष्ठ निवड समितीची हकालपट्टी केली. यामध्ये चेतन शर्मा, हरविंदर सिंग, सुनील जोशी आणि देबाशिष मोहंती यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. चेतन निवड समितीचे प्रमुख असल्याने, भारत दोन आयसीसी स्पर्धांमध्ये विजेतेपदाविना परतला. टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2022 ) उपांत्य फेरीत पराभूत झाला तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभूत झाला. अशा परिस्थितीत रोहित शर्माचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारत टी-20 विश्वचषक-2022 मध्ये खेळला आणि उपांत्य फेरीत पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला होता.  

हार्दिकला वर्ल्डकपपर्यंत जबाबदारी मिळेल का?

बीसीसीआय (BCCI) आता कर्णधारपद विभाजित करण्याचा विचार करत असून तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार बनवले जाऊ शकतात. एकदिवसीय आणि कसोटीचे कर्णधारपद रोहितने सांभाळले आहे. तर हार्दिक पांड्या (Hardik Pandya T20 Captain) यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या 2024 टी-20 विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचा सर्वात लहान फॉरमॅटचा कर्णधार असेल. हार्दिक सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत असून यामध्ये कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केल्यास या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल.  

वाचा: T20 World Cup मधील पराभवानंतर BCCI ची मोठी कारवाई, सर्व निवडकर्त्यांची हकालपट्टी 

कर्णधारपद आणि फलंदाजी या दोन्हीत रोहित फ्लॉप ठरला

2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताने एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. अशा स्थितीत रोहित शर्मा यावेळी विजेतेपदाचा दुष्काळ संपवू शकेल, अशी आशा सर्वांनाच होती. पण रोहित आयसीसी नॉकआऊट सामन्यांमध्ये टीम इंडियाचा निराशाजनक रेकॉर्ड सुधारू शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही रोहितच्या कर्णधारपदाचा बेरंग दिसला. संपूर्ण स्पर्धेत त्याची फलंदाजी खराब राहिली आणि त्याने सहा सामन्यांत 19.33 च्या सरासरीने 116 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 106.42 होता, जो खूप वाईट म्हणता येईल.