IND vs SL: विजयाचा खरा हिरो कोण? कॅप्टन रोहित शर्मा म्हणतो....

श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने तब्बल 222 धावांनी विजय मिळवला, या विजयाचा खरा हिरो कोण हे सांगताना कॅप्टन रोहित शर्मा काय म्हणाला पाहा

Updated: Mar 6, 2022, 07:27 PM IST
IND vs SL: विजयाचा खरा हिरो कोण? कॅप्टन रोहित शर्मा म्हणतो.... title=

मुंबई : रोहित शर्माच्या हाती कसोटी फॉरमॅटची सूत्र आली आणि टी 20 प्रमाणेच त्याने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीची दणदणीत सुरुवात केली. श्रीलंके विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 222 धावांनी विजय मिळवण्यात टीम इंडियाला मोठं यश आलं आहे. टीम इंडियाने या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाच्या विजयानंतर या यशाचं श्रेय कोणाला जातं याचा खुलासा केला. इतकंच नाही तर त्याने अनेक मनातल्या गोष्टीही व्यक्त केल्या. रोहित शर्माने यावेळी विजयाचा खरा हिरो कोण आहे हे देखील सांगितलं. 

कर्णधारानं सांगितलं गुपित

कसोटी सामन्याची सुरुवात विजयाने केल्यानंतर रोहित शर्माने मनातील भावना व्यक्त केल्या. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात उत्तम कामगिरी केली. रविंद्र जडेजानं अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याचा या विजयात सिंहाचा वाटा आहे. त्याने सामन्यात नाबाद 175 धावांसह एकूण 9 विकेट घेतल्या.

जडेजाच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाला 222 धावांनी विजय मिळवता आला. श्रीलंका संघ  पहिल्या डावात 174 धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात 178 धावा करण्यात खेळाडूंना यश आलं. यावेळी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. आर अश्विननं कपिल देव यांचा रेकॉर्ड मोडला आहे. 

विजयाचा खरा हिरो कोण?

रोहित शर्मा पुढे बोलताना म्हणाला की, असं वाटलं नव्हतं की हा सामना एवढा लवकर संपेल. सर्वांची खूप चांगली कामगिरी केली. रविंद्र जडेजा या सामन्याच्या विजयाचा खरा हिरो आहे. जडेजाचं द्विशत होण्यासाठी काही धावा शिल्लक होत्या त्याच वेळी डाव घोषित करायचा की नाही असा प्रश्न होता. मात्र त्यावेळी तो निस्वार्थीपणे डाव घोषित करण्यासाठी तयार झाला. 

याशिवाय आर अश्विननं कपिल देव यांचा विक्रम मोडला. एका डावात 4 विकेट्स घेतल्या. तर अनिल कुंबळे यांचा विक्रम मोडण्यासाठी काही विकेट्स दूर असला तरी पुढचं टार्गेट ते असणार आहे.