मोहाली : रविंद्र जडेजानं मोहाली इथल्या मैदानावर एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी रविंद्र जडेजानं 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर त्याच्या तुफान बॅटिंगमुळे टीम इंडिया 574 धावांचा पल्ला गाठू शकली. सर जडेजा 175 धावा करून नाबाद राहिला.
टीम इंडिया पहिल्याच डाव्यात श्रीलंकेला 222 धावांनी पराभूत करण्यात यशस्वी ठरली. पण रविंद्र जडेजाचं द्विशतकाचं स्वप्न हुकलं. याआधी टीम इंडियाने श्रीलंकेला टी 20 मध्ये 3-0 ने पराभूत केलं आहे.
रविंद्र जडेजा एकाच कसोटी सामन्यात 150 हून अधिक धावा काढणारा आणि एकाच डावात 5 विकेट्स घेणारा जगातील सहाव्या क्रमांकाच खेळाडू ठरला आहे. 49 वर्षांनंतर असा खेळाडू पुन्हा एकदा जगाला पाहायला मिळाला. जडेजाही ही कमाल कामगिरी आहे. त्याच्या या कामगिरीचं जगभरात कौतुक होत आहे.
रविंद्र जडेजा हा कारनामा करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. 1952 मध्ये वीनू मांकड यांनी तर 1962 मध्ये उमरीगर अशी धडाकेबाज कामगिरी केली होती. आता या दोघांनंतर रविंद्र जडेजाचं नाव या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
वेस्ट इंडिजच्या डेनिस एन्किन्सन आणि गॅरी सोबर्स यांचाही 6 खेळाडूंच्या यादीत समावेश आहे ज्यांनी कसोटी सामन्यात 150 धावा करण्याव्यतिरिक्त 5 विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे जडेजाने खास खेळाडूंमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली.
श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.