Rohit Sharma : वाढदिवसाच्या दिवशी रोहितने चोरला चाहत्याचा फोन? व्हिडीओ व्हायरल

मुंबईने (Mumbai Indians) राजस्थानवर विजय मिळवला. विजयानंतर रोहित शर्मा (Rohit sharma) एका चाहत्याचा फोन चोरताना दिसला. हे नेमकं काय प्रकरण आहे, ते पाहुया.

सुरभि जगदीश | Updated: May 1, 2023, 07:29 PM IST
Rohit Sharma : वाढदिवसाच्या दिवशी रोहितने चोरला चाहत्याचा फोन? व्हिडीओ व्हायरल title=

Rohit Sharma : 30 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) त्याचा 36 वा वाढदिवस साजरा केला. मुंबईच्या टीमने रोहितला वाढदिवसाच्याच (Rohit sharma Birthday) दिवशी विजयाचं गिफ्ट दिलं आहे. राजस्थानविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवून मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यंदाच्या सिझनमधील चौथा विजय मिळवला आहे. दरम्यान या सामन्यातनंतर एक अशा किस्सा घडला, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

आयपीएलच्या 1000 व्या सामन्यात राजस्थानने मुंबईला जिंकण्यासाठी 213 रन्सचं आव्हान दिलं होतं. वाढदिवसाच्या दिवसी रोहित शर्माला (Rohit sharma) फलंदाजीमध्ये मोठी कामगिरी करता आली नाही. मात्र कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि टीम डेविड यांच्या तुफान खेळीने मुंबईने (Mumbai Indians) राजस्थानवर विजय मिळवला. विजयानंतर रोहित शर्मा (Rohit sharma) एका चाहत्याचा फोन चोरताना दिसला. हे नेमकं काय प्रकरण आहे, ते पाहुया.

रोहितने चोरला फॅनचा फोन 

रोहित शर्माचे (Rohit sharma) चाहते काही कमी नाहीत. रविवारी वाढदिवसाच्या निमित्ताने खास वानखेडेवर सामना रंगला असताना अनेक चाहते रोहितचा खेळ पाहण्यासाठी आले होते. यावेळी सामना संपल्यानंतर रोहितने (Rohit sharma) सर्व चाहत्यांसोबत सेल्फी काढायचा निर्णय घेतला. याच घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रोहित पव्हेलियनमध्ये बसलेल्या चाहत्यांजवळ उभा आहे. यावेळी एका चाहत्याचा फोन घेऊन तो सेल्फी काढतोय, मात्र सेल्फी काढून झाल्यानंतर रोहित शर्मा (Rohit sharma) त्या चाहत्याचा फोन पुन्हा न देता स्वतःसोबत घेऊन जातो. दरम्यान यावेळी रोहित काहीसा मस्करीच्या मूड दिसून आला. याचाच अर्थ तो फोन चोरी करण्याची केवळ एक्टिंग करत होता. 

रोहित (Rohit sharma) ज्यावेळी त्या चाहत्याचा फोन घेऊन जात असतो, त्यावेळी त्या चाहत्याचा चेहरा बघण्यासारखा असतो. फोन...फोन असं तो चाहतो ओरडतो, अखेर रोहित देखील हसत हसत त्याचा फोन परत करतो. रोहितच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मात्र चांगलाच व्हायरल होतोय.  

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) राजस्थानवर 'रॉयल' विजय

रविवारी वानखेडेच्या मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.  यावेळी राजस्थानचा ओपनर यशस्वी जयस्वालच्या शतकी खेळी केली. प्रथम फलंदाजी करून राजस्थान रॉयल्सने 212 रन्स केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादव, ग्रीन आणि टीम डेविड यांनी उत्तम खेळी केली. अखेरच्या ओव्हरमध्ये 3 सिक्स लगावत टीम डेविडने मुंबईला विजय मिळवून दिला.