Hardik Pandya Critisizes MI: गुजरातने आरसीबीचा पराभव केला आणि मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) प्लेऑफमध्ये एन्ट्री झाली. त्यांचा सामना आज लखनऊ सुपर जायन्ट्स (Lucknow Super Giants) संघाशी होणार आहे. मुंबई इंडियन्सकडे चॅम्पियन्स खेळाडू आहेत आणि त्याचा फायदा त्यांना होतो, असं वक्तव्य गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने केलं होतं, त्यावर आता रोहित शर्मा (Rohit Sharma) याने हार्दिकला रोखठोक उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता रोहित आणि हार्दिकमध्ये वाद पेटलाय का? असा सवाल विचारला जात आहे.
मला वाटतं की, युवा खेळाडूंनी माझ्याकडे त्यांची समस्या घेऊन यावं. तुम्हाला टीममधील खेळाडूंच्या पाठिशी उभं राहावं लागतं आणि तसं खेळाडूंसह नातं निर्माण करावं लागतं. त्यामुळे एकमेकांबाबतचा विश्वास निर्माण होतो. त्यानंतर त्यांच्यासोबत मुक्तपणे बोलता देखील येतं. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या यांचीही स्टोरी अशीच आहे. टीम यांच्यामागे भक्कमपणे उभी राहिली, असं म्हणत रोहित शर्माने गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या (Rohit Sharma On Hardik Pandya) याला खडे बोल सुनावलं आहे.
बुमराह, पांड्याप्रमाणे आता तिलक वर्मा व नेहर वढेरा त्या फेजमध्ये आहेत. 2 वर्षांनंतर तिलक आणि नेहल यांना लोकं सुपरस्टार म्हणून ओळखतील. तिलक वर्मा आणि नेहर वढेरा हे खेळाडू मुंबई आणि भारतीय क्रिकेटचं भविष्य आहेत, असंही रोहित शर्मा म्हणाला आहे. फ्रँचायझीने बुमराह, अक्षर, कृणाल आणि हार्दिक यांचं स्काऊटिंग केलं. त्यांच्या यशाचं श्रेय हे आमच्या प्रशिक्षक आणि स्काऊट यांना जातं, असंही रोहित यावेळी म्हणाला आहे.
आणखी वाचा - Virat Kohli: विराट कोहलीची मोठी भविष्यवाणी, 'हा' खेळाडू म्हणजे टीम इंडियाचं भविष्य!
दरम्यान, आमची टीम सुपरस्टार होती. या खेळाडूंना आम्ही खरेदी केलं, स्काऊट टीमनं दिवसरात्र मेहनत घेऊन फ्रँचायझीने टीमला सुपरस्टार बनवलं, असं म्हणत रोहित शर्माने हार्दिकला रोखठोक उत्तर दिलंय. लोकं सहज म्हणतात, हा सुपरस्टार संघ आहे, पण यामागे सर्वांची मेहनत आहे, असं म्हणत रोहितने हार्दिकला टोला लगावला आहे.