IND vs SL: दुसऱ्या टेस्टसाठी 'या' खेळाडूचा पत्ता होणार कट!

रोहित शर्मा सिरीज जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. यावेळी ओपनिंगसाठी रोहित मोठा बदल करणार आहे.

Updated: Mar 11, 2022, 08:32 AM IST
IND vs SL: दुसऱ्या टेस्टसाठी 'या' खेळाडूचा पत्ता होणार कट! title=

बंगळरू : श्रीलंका टीम सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत विरूद्ध टीम इंडिया यांच्यात सध्या टेस्ट सिरीज सुरु आहे. यामध्ये पहिला सामना टीम इंडियाने जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली. तर दुसरा टेस्ट सामना उद्यापासून सुरु होणार असून कर्णधार रोहित शर्मा सिरीज जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. यावेळी ओपनिंगसाठी रोहित मोठा बदल करणार आहे.

ओपनिंग पार्टनर बदलणार रोहित

दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी ओपनर मयंक अग्रवालला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अग्रवालच्या जागी रोहित शर्मासोबत शुभमन गिल ओपनिंगला उतरणार आहे. शुभमन गिल यापूर्वी देखील टीम इंडियासाठी ओपनर म्हणून खेळला आहे. त्याचप्रमाणे शुभमन गिलला चांगल्या टेकनिकने खेळण्याचा अनुभव आहे.

उद्यापासून सुरु होणाऱ्या डे-नाईट टेस्ट सामन्यातून कर्णधार रोहित शर्मा मयंक अग्रवालला सामन्यातून बाहेर केलं जाऊ शकतं. मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात मयंक अग्रवाल अवघ्या 33 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर सोशल मीडियावर मयंकला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्याची मागणी केली गेली.

मयंक अग्रवाल गेल्या काही दिवसांपासून अत्यंत खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे उद्याच्या टेस्टमधून मयंक अग्रवालचा पत्ता कट होण्याची चिन्ह आहेत. गेल्या 6 टेस्ट डावांमध्ये मयंक अग्रवालला एकंही हाफ सेंच्युरी मारता आलेली नाही. अशा परिस्थितीत मयंक अग्रवालचं दुसऱ्या टेस्ट सामन्यातील स्थान धोक्यात आली आहे.