IND vs NZ: सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येतेय. यावेळी पहिल्या सामन्यात भारताने निसटता विजय मिळवला. 349 रन्सचा डोंगर उभारून देखील अवघ्या 12 रन्सने टीम इंडियाचा विजय झाला. या सामन्यात शुभमन गिल (Shubman Gill) सोडून इतर कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलंच चोपलं. अशातच आयीसीसीने (ICC) टीम इंडियाला एक मोठा धक्का दिला आहे.
आयसीसीकडून टीम इंडियावर भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यामध्ये स्लो ओवर रेट टाकल्याने सामना फीच्या 60 टक्के दंड ठोठवण्यात आला आहे. आज म्हणजेच 20 जानेवारी रोजी आयसीसीने अधिकृतरित्या याची माहिती दिली आहे. मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी याबाबत निर्णय दिला की, टीम इंडियाने निर्धारित वेळेपेक्षा तीन ओव्हर टाकले. शिवाय त्यांना ठोठवण्यात आलेला दंड रोहित शर्माने स्वीकारलाय.
ICC आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार खेळाडू तसंच खेळाडू सपोर्ट कर्मचार्यांना प्रत्येक ओव्हरसाठी खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावला जातो.
पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाकडून सर्वाधिक 208 धावा शुभमन गिलने (Shubman Gill)ठोकल्या होत्या. गिलला सोडून कोणत्याच खेळाडूला मोठी धावसंख्या करता आली नव्हती. त्यामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 350 धावांचे आव्हान ठेवले होते.
दरम्यान टीम इंडियाने 350 सारखी डोंगराऐवढी धावसंख्या उभारून सुद्धा त्यांना विजय मिळवण्यासाठी खुप मशागत करावी लागली होती. कारण टीम इंडियाने न्यूझीलंडची अर्धी बॅटींग लाईनअप पव्हेलियन धाडली होती. त्यानुसार हत्ती गेला होता मात्र शेपटाने घाम काढला होता.न्यूझीलंडचा शेपूट ठरलेल्या ब्रेसवेल (Michael Bracewell) टीम इंडियाची अवस्था बिकट केली होती.मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये शार्दूलने त्याची विकेट घेऊन 12 धावांनी सामना जिंकला.दरम्यान आता तीन सामन्याच्या वनडे मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.