Rohit Sharma : काय गरज होती...शेकलं ना आता! फिल्डवर अंपायरसोबतचं 'ते' कृत्य येणार रोहितच्या अंगाशी?

Rohit Sharma : फिल्डवर रोहित शर्माचा गमतीशीर अंदाज आपल्या प्रत्येकाला माहितीये.  यावेळी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) ऑन फिल्ड अंपायरशी मस्ती करताना दिसला.

Updated: Jun 9, 2023, 04:43 PM IST
Rohit Sharma : काय गरज होती...शेकलं ना आता! फिल्डवर अंपायरसोबतचं 'ते' कृत्य येणार रोहितच्या अंगाशी? title=

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) फायनल सामन्यात पुन्हा फेल गेला. या सामन्यामध्ये अवघे 15 रन्स करून रोहित माघारी परतला. दरम्यान फिल्डवर रोहित शर्माचा गमतीशीर अंदाज आपल्या प्रत्येकाला माहितीये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल ( ICC World Test Championship ) सामन्यात देखील त्याचा असाच अंदाज दिसून आला. यावेळी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) ऑन फिल्ड अंपायरशी मस्ती करताना दिसला. मात्र रोहितचं हे वागणं त्याला महागात पडण्याची शक्यता आहे. 

इंग्लडच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना खेळवला जातोय. या सामन्यामध्ये रिव्हू घेण्यापासून वाचण्यासाठी हिटमॅनने एक अजब शक्कल लढवली. यावेळी रोहित शर्माने जे कृत्य केलं त्यावर ऑन फिल्ड अंपायर देखील हसू रोखू शकले नाहीत. 

DRS वेळी रोहित शर्माचं कृत्य होतंय व्हायरल

8 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा ( ICC World Test Championship ) दुसरा सामना खेळवण्यात आला. या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली. मात्र यावेळी टीम इंडिया फिल्डींग करत असताना रोहित शर्मा ( Rohit Sharma ) खूप उत्साहित असल्याचं दिसून आलं. ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना 97 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता. यावेळी ओव्हरचा पाचवा बॉल एलेक्स कॅरीच्या पॅढवर जाऊन लागला. विकेटसाठी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी अपील केलं. मात्र अंपायरने यावेळी नॉट आऊट करार दिला. 

दरम्यान यावेळी रोहितने ( Rohit Sharma ) डीआरएस घेतला नाही. टीम इंडियाच्या कर्णधाराने यावेळी डीआरएस घेण्याची एक्शन केली मात्र इतर खेळाडूंनी त्याला बॉल स्विंग होऊन लेगस्टंपपासून दूर जात असल्याचं सांगितलं. दरम्यान यावेळी डीआरएस घेण्याची वेळ देखील संपली होती. 

रोहित शर्मावर होणार कारवाई?

रोहित शर्मा ( Rohit Sharma ) च्या या कृत्यावर अंपायर देखील हसू लागले. दुसरीकडे रोहित शर्माला त्याचं हे कृत्य महागात पडू शकतं. यामध्ये अंपायरला भ्रमित करण्याचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. मात्र याबाबत अजून अधिकृतरित्या काही विधान करण्यात आलेलं नाही.