श्रीलंकेत बऱ्याच वर्षांनतर भारताचा पराभव

श्रीलंकेच्या फलंदाजांपुडे भारताचे गोलंदाज काहीसे फिके पडले आणि भारताला जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे श्रीलंकेतील विजयाची प्रदीर्घ काळापासून चालत आलेली विजयी परंपरा खंडीत झाली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 7, 2018, 10:51 AM IST
श्रीलंकेत बऱ्याच वर्षांनतर भारताचा पराभव title=

नवी दिल्ली : श्रीलंकेच्या फलंदाजांपुडे भारताचे गोलंदाज काहीसे फिके पडले आणि भारताला जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे श्रीलंकेतील विजयाची प्रदीर्घ काळापासून चालत आलेली विजयी परंपरा खंडीत झाली. ही परंपरा खंडीत करण्याची नामुष्कीजनक कामगिरी टी-२० सामन्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नोंदली गेली.

शिखर धवनची खेळी वाया गेली

श्रीलंकेच्या कुसाल परेराच्या धमाकेदार अर्धशतकी खेळी आणि श्रीलंकेच्या फलंदाजांसमोर भारताच्या गोलंदाजांची काहीशी फिकी कामगिरी यामुळे टी-२० सामन्यात भारताचा पराभव झाला. या पराभवामुळे शिखर धवनसारख्या एका चांगल्या खेळाडूची टी-२० कारकीर्दीतील चांगली खेळी वाया गेली. धवनने ४९ चेंडूमध्ये तब्बल अर्धा डजन चौरा आणि तितकेच षटकार ठोकत ९० धावा केल्या. ही त्यांची अनेक उत्कृष्ट खेळीपैकी एक म्हणून ओळखली गेली. 

२०१५ नंतर पहिल्यांदाच भारत श्रीलंकेत पराभूत

या पराभवाच्या रुपाने श्रीलंकेतील भारताच्या तब्बल आडीच वर्षांच्या विजयी परंपरेचे खंडन झाले. २०१५ नंतर श्रीलंकेत भारतीय क्रिकेट संघ कधीच पराभूत झाला नव्हता. पण, २०१८ मध्ये ही परंपरा खंडीत झाली. विशेष म्हणजे २०१५ पासून भारत श्रीलंकेत झालेल्या काणत्याही प्रकारच्या क्रिकेट प्रकारातील सामन्यात भारताचा पराभव झाला नव्हता.