INDvsSL : पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा भारतावर ५ गडी राखून विजय

निडास ट्रॉफी त्रिकोणी सीरीजसाठी झालेल्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने भारताला ५ गडी राखून पराभूत केले. भारताने दिलेल्या १७५ धावांचे लक्ष्याचा पाटलाग करताना श्रीलंकेने १९ षटकांमध्ये हा विजय मिळवला.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 7, 2018, 10:23 AM IST
INDvsSL : पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा भारतावर ५ गडी राखून विजय title=

कोलंबो : निडास ट्रॉफी त्रिकोणी सीरीजसाठी झालेल्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने भारताला ५ गडी राखून पराभूत केले. भारताने दिलेल्या १७५ धावांचे लक्ष्याचा पाटलाग करताना श्रीलंकेने १९ षटकांमध्ये हा विजय मिळवला.

कुसल परेराच्या शानदार ६६ धावा तसेच, शेवटच्या षटकात शिसारा परेरा आणि शनाकाने शानदार खेळी केली. या खेळीच्या बदल्यात श्रीलंकेने तडाकेबंद विजय मिळवला. १७ व्या षटकापर्यंच श्रीलंकेने १५० धावा केल्या होत्या. दरम्यान, विजयासाठी श्रीलंकेला १८  चेंडूत २४ धावांची गरज होती. मैदानावर तिसारा परेरा आणि शनाका फलंदाजी करत होते. पंधराव्या षटकात उपल थरंगाने १७ धावांवर बोल्ड केले. त्यासमयी श्रीलंकेचा धावफलक हा १५ षटके १३७ धावा असा होता. आता श्रीलंकेला केवळ ३८ धावांची गरज होती. सामना कोणत्याही बाजूला झुकू शकतो अशी स्थिती होती.

दरम्यान, अकेरच्या क्षणी पारडे फिरले सामना श्रीलंकेने जिंकला.