हिटमॅन रोहित शर्माने रचला इतिहास

भारताचा हिटमॅन रोहित शर्माने मोहालीच्या मैदानावर जबरदस्त द्विशतक ठोकेलय. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 13, 2017, 03:21 PM IST
हिटमॅन रोहित शर्माने रचला इतिहास title=

मोहाली : भारताचा हिटमॅन रोहित शर्माने क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचलाय. वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्माने तिसऱ्यांदा शानदार डबल सेंच्युरी ठोकलीये. वनडेत तिसऱ्यांदा डबल सेंच्युरी ठोकणारा तो पहिला आणि एकमेव फलंदाज ठरलाय.

मोहालीच्या मैदानावर आज रोहित नावाचे वादळ पाहायला मिळाले. पहिले ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध दोन अशा तीन डबल सेंच्युरी त्याने ठोकल्यात. पहिले शतक संयंमी पद्धतीने खेळल्यानंतर रोहितने जोरदार फटकेबाजी सुरु केली. 

 

त्याने या सामन्यात १५३ चेंडूत नाबाद २०८ धावा झळकावल्या. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या रोहितने दुसऱ्या सामन्यात मात्र कसर भरुन काढली. नेतृत्व करतानाच रोहितने दमदार डबल सेंच्युरी लगावलीय.