ख्रिस गेलने तोडला आपलाच रेकॉर्ड...

टी 20 मध्ये आपल्या घडाकेबाज फलंदाजीने गोलंदाजांना चकीत करणाऱ्या वेस्ट इंडीजच्या क्रिस गेलने प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 13, 2017, 02:45 PM IST
ख्रिस गेलने तोडला आपलाच रेकॉर्ड... title=

नवी दिल्ली : टी 20 मध्ये आपल्या घडाकेबाज फलंदाजीने गोलंदाजांना चकीत करणाऱ्या वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. 

काय केला रेकॉर्ड ?

आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वाधिक सिक्सर ठोकण्याचा नवा रेकॉर्ड बनवला आहे. गेलने शेर ए बांग्ला नॅशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या फायनल मध्ये रंगपुर राइडर्सकडून खेळत असताना 69 चेंडूत 146 धावा केल्या. त्यामुळे टी20 मध्ये त्याच्या एकूण धावांची संख्या 11056 झाली आहे. 

 सर्वाधिक सिक्सर

तसंच  टी 20 मध्ये सर्वाधिक सिक्सर ठोकण्याचा नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला. 2013 मध्ये रॉयल चॅलेंजेस बंगरूळमधून खेळत असताना आयपीएल मॅचमध्ये 175 धावा बनवल्या होत्या. यात त्याने 17 सिक्सर ठोकावल्या. आता त्याने स्वतःचाच रेकॉर्ड तोडत 18 सिक्सरचा विक्रम केला आहे.