MI vs RR, IPL 2024 : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा सहा विकेटने दारुण पराभव केला. मुंबईने दिलेले 126 धावांचं आव्हान राजस्थानने सहा विकेट आणि 27 चेंडू राखून सहज पार केलं अन् सलग तिसरा विजय मिळवला. राजस्थानसाठी रियान पराग (Riyan Parag) याने दमदार अर्धशतकीय खेळी केली अन् गोलंदाजीत ट्रेंड बोल्टने (Trent Boult) 3 विकेट्स घेत मुंबईच्या फलंदाजीची कंबर मोडली होती. त्यामुळे मुंबईला घरच्या मैदानावर पराभवाचं तोंड पहावं लागलं. सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला. प्रेक्षकांना पांड्याला चांगलंच डिवचलं. मात्र, रोहितने सामन्यावेळी असं काही केलं की, रोहितने पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत.
बुमराहच्या 4 थ्या ओव्हरवेळी हार्दिक पांड्याने एक अवघड कॅच सोडला. जॉस बटलरचा कॅच सोडल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी रोहित देखील नाराज दिसत होता. मात्र, त्यानंतर जेव्हा रोहित बॉन्ड्रीलाईनवर गेला. तेव्हा प्रेक्षकांनी रोहित रोहितच्या घोषणा दिल्या. तर पांड्या बूबूबू.. करत डिवचलं. मात्र, रोहितने त्यांना हातवारे करत शांत राहण्याचं आवाहन केलं. त्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल (Rohit Sharma Video) होत आहे.
Hardik pandya dropped the catch and crowd Started Booing (use headphones)
Atlast Hardik pandya's tears were pure gold mann ! #MIvRR #RohitSharma pic.twitter.com/U5TA6ccIq4
— Melbo (@Thewhite__guy) April 1, 2024
Rohit Sharma saying crowd not to boo Hardik Pandya. #MIvsRR #RRvsMI pic.twitter.com/Qcf2wvplb5
— Vishveshver Singh Sai (@Vishveshver45) April 1, 2024
संजय मांजरेकरांची प्रेक्षकांना तंबी
संजय मांजरेकर यांनी टॉसवेळी मुंबईच्या वानखेडे मैदानावर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना तंबी दिली. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यासाठी टाळ्या वाजवा अन् नीट वागा, असं संजय मांजरेकर यावेळी म्हणाले. त्यावेळी हार्दिक पांड्या हसताना दिसला. मात्र, सामन्यात त्याला अनेकदा प्रेक्षकांनी डिवचलं.
राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आणि सहा गुणांसह गुणतालिकेत पहिले स्थान गाठले. त्याचबरोबर मुंबईला या स्पर्धेत आतापर्यंत पहिला विजय मिळवता आलेला नाही आणि ती 10व्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन, रोहित शर्मा, नमन धीर, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (C), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (C), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.