Rohit Sharma: रविवारी मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर (Wankhede Stadium) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात सामना रंगला होता. आयपीएलच्या 1000 व्या सामन्यात मुंबईने 6 विकेट्सने राजस्थानवर विजय मिळवला होता. यावेळी राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी करत 212 रन्स करत 213 चं मुंबईला (Mumbai Indians) टार्गेट दिलं होतं. दरम्यान या सामन्यामध्ये अंपायर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचं अनेकदा बिनसलेलं दिसलं. या व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media viral video) चांगलाच ट्रेंड होतोय.
मुंबईविरूद्धच्या सामन्यात राजस्थानचा ओपनर फलंदाज जशस्वी जयस्वालने 62 बॉल्समध्ये 124 रन्स केले. जयस्वालच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने 200 रन्सचा टप्पा पार केला. मात्र याचवेळी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा हा मैदानावरील अंपायरशी भिडताना दिसला.
या दोघांमध्ये बराच वेळ वाद सुरु असल्याचं दिसून आलं. अखेरीस हा वाद मिटवण्यासाठी सूर्यकुमार यादवला मध्यस्ती करावी लागली. दरम्यान अंपायर आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये नेमका कोणत्या कारणाने वाद झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही.
मात्र मिळालेल्या माहितीनुसार, जयस्वालला बाद करण्यासाठी अर्शद खानने फुल टॉस बॉल टाकला. दरम्यान अरशदचा हा बॉल कमरेच्या वर आहे की नाही हे तपासण्यासाठी रिव्ह्यू घेण्यात आला. दरम्यान याच मुद्द्यावरून रोहित शर्मा अंपायरशी वाद घालताना दिसतोय.
— Cricbaaz (@cricbaaz21) May 1, 2023
वाढदिवसाच्या दिवशी रोहितला 5 बॉलमध्ये केवळ 3 रन्स करता आले. संदीप शर्माच्या बॉलवर रोहित शर्मा क्लिन बोल्ड झाला. मात्र, त्यानंतर रोहितच्या विकेटचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा बॅटिंग करत असून विकेटमागे संजू उभा आहेत. संदीप शर्माच्या बॉलवर कॅच झेलत असताना संजूचा हात विकेट्सला लागतो आणि स्टंप्सच्या लाईट्स लागतात. त्यामुळे रोहितला आऊट (Rohit Sharma Out) देण्यात आलं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं दिसून येतंय.
राजस्थानविरूद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये 17 रन्स हवे असताना टीमने लागोपाठ 3 बॉल्सवर सिक्स लगावल्या आणि मुंबईला विजय मिळवून दिलं. यावेळी रोहित शर्मा अंपायरशी बोलत असल्याचं कॅमेरात कैद झालं. यावेळी रोहित शर्मा अंपायरने काहीतरी समजवताना दिसतंय. तर यावरून युझर्सने रोहित शर्माने चिटींग केली असल्याचं म्हटलं जातंय.