'मारो ऋषभ मारो...', सामन्यानंतर ऋषभ पंत आणि अंपयायरमध्ये झालेली बाचाबाची कॅमेरात कैद

दरम्यान यामध्येच आता सामन्यानंतरचा एक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Updated: Apr 24, 2022, 09:51 AM IST
'मारो ऋषभ मारो...', सामन्यानंतर ऋषभ पंत आणि अंपयायरमध्ये झालेली बाचाबाची कॅमेरात कैद title=

मुंबई : राजस्थान विरूद्धचा हातातोंडाशी आलेला सामना दिल्लीने अवघ्या 15 रन्सने गमावला. मात्र या सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. अंपायरने दिलेल्या एका नो बॉलच्या निर्णयावरून दिल्लीचा कर्णाधार ऋषभ पंत चांगलाच तापला होता. दरम्यान यामध्येच आता सामन्यानंतरचा एक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

सामन्यानंतर ऋषभ पंत बाऊंड्री लाईनवर अंपायरशी हुज्जत घालताना दिसला. या व्हिडीयोवरून सामन्यानंतरही ऋषभ पंतचा राग निवळलेला दिसला नाही. या व्हिडीयोमध्ये पंत अंपायरला बोट दाखवून काहीतरी सांगत असल्याचं दिसतंय. यावेळी तो रागात असल्याचंही स्पष्टपणे कळतंय.

याचदरम्यान स्टेडियममध्ये असलेल्या चाहत्यांनी 'मारो ऋषभ पंत मारो' असे नारे लावले होते. दरम्यान या घटनेचा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणी ऋषभ पंतसोबत शार्दूल ठाकूर आणि प्रवीण आम्रे यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 

ऋषभ पंतवर लेव्हल 2 मधील कलम 2.7 नियमाचं उल्लंघन केल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. या दोघांनी आपली चूक मान्य केली असून मॅच फीमधील 100 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.  शार्दूल ठाकूरने कलम 2.8 नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. हा आरोप त्याने मान्यही केला. त्याला मॅच फीमधील 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. 

नेमकं प्रकरण काय?

शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला विजयासाठी 36 रन्सची गरज होती. ओबेद मेकॉयला यावेळी 3 बॉलवर 3 सिक्स बसले. पण तिसरा बॉल नो बॉल असल्याचं पंत म्हणाला. मात्र अंपायरने तो नो बॉल दिला नाही. 

अंपायरच्या निर्णयावर चिडलेल्या पंतने आपल्या टीममधील खेळाडूंना क्रीझ सोडून बाहेर येण्यासाठी सांगितलं. कोचने मध्यस्ती केल्यानंतर पुढे मॅच सुरू झाली. अंपायर नो बॉल चेक करू शकला असता मात्र त्याने तसं केलं नाही.