मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 23 एप्रिल रोजी डबल हेडर सामने खेळवण्यात आले. गुजरातने कोलकाता टीमला पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात हैदराबादने बंगळुरूचा पराभव केला. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये या सामन्यानंतर मोठा बदल झाला आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी केली आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपल्या नावाची नोद केलीय.
पांड्याने के एल राहुलला टाकलं मागे?
गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने आयपीएलमध्ये यामध्ये दमदार कामगिरी केली आहे. ब्रेकनंतर परतल्यानंतर पांड्या पुन्हा चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शानदार खेळी खेळली. दुखापतीतून परतणाऱ्या पंड्याने 49 चेंडूत 67 धावांची खेळी खेळली.
त्यानंतर हार्दिक पांड्याने केएल राहुलला मागे टाकले आहे. हार्दिक पांड्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप-2 मध्ये आला आहे. पंड्याने 6 सामन्यात 73.75 च्या सरासरीने 295 धावा केल्या. केएल राहुलने 7 सामन्यात 44.17 च्या सरासरीने 265 धावा केल्या. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत जोस बटलरचं नाव आघाडीवर आहे. यावेळी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकात खूप मोठा फरक आहे.
जोस बटलरने 7 सामन्यात 491 धावा केल्या आहेत. त्याच्या आसपासही सध्या कोणी नाही. ऑरेंज कॅपवर आपलं नाव कोरण्यासाठी जोस बटलर सध्या प्रयत्नशील आहे. दुसऱ्या कोणाला फिरकू देणार नाही असं आताच्या तरी सामन्यातून चित्र स्पष्ट दिसत नाही.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोण पुढे?
जोस बटलर - 7 सामने 491 धावा
हार्दिक पांड्या - 6 सामने 295 धावा
केएल राहुल - 7 सामने 265 धावा
फाफ डु प्लेसिस - 8 सामने 255 धावा
पृथ्वी शॉ - 7 सामने 254 धावा
पर्पल कॅपमध्ये उमेश यादवी एन्ट्री
ऑरेंज कॅपशिवाय पर्पल कॅपच्या शर्यतीतही चुरशीची लढत यंदाच्या हंगामात पाहायला मिळत आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर केकेआरचा वेगवान गोलंदाज उमेश यादव टॉप 5 च्या यादीत आला आहे. या सामन्यात उमेशने 1 बळी घेतला. आता त्याच्याकडे 8 सामन्यात 11 विकेट्स झाल्या असून पर्पल कॅपच्या शर्यतीत तो 5 व्या स्थानावर आला आहे. या यादीत युझवेंद्र चहल आघाडीवर आहे.
पर्पल कॅप- टॉप 5 बॉलर्स
बॉलर्स
युजवेंद्र चहल- 7 सामने- 18 विकेट्स
टी नटराजन- 7 सामने- 15 विकेट्स
कुलदीप यादव- 7 सामने- 13 विकेट्स
ड्वेन ब्रावो- 7 सामने- 12 विकेट्स
उमेश यादव - 8 सामने- 11 विकेट्स