T20 WC: 'तो फार दुखावला आहे, त्याने फोन करुन...,' रिंकू सिंगच्या वडिलांनी केला खुलासा, 'सर्व मिठाई, फटाके...'

T20 World Cup: बीसीसीआयने (BCCI) आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) संघाची घोषणा केली आहे. दरम्यान आपल्या कामगिरीने सतत सर्वांना प्रभावित करणाऱ्या रिंकू सिंगला (Rinku Singh) संघात स्थान दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 1, 2024, 06:10 PM IST
T20 WC: 'तो फार दुखावला आहे, त्याने फोन करुन...,' रिंकू सिंगच्या वडिलांनी केला खुलासा, 'सर्व मिठाई, फटाके...' title=

T20 World Cup: बीसीसीआयने (BCCI) आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) संघाची घोषणा केली आहे. दरम्यान आपल्या स्फोटक फलंदाजीने सतत सर्वांना प्रभावित करणाऱ्या रिंकू सिंगला (Rinku Singh) संघात स्थान दिल्याने अनेक क्रिकेट चाहते आणि तज्ज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आयपीएल 2024 मध्ये तसंच टी-20 संघात पदार्पण केल्यापासून रिंकू सिंगने जबरदस्त कामगिरी करत आपण फॉर्ममध्ये असल्याचं दाखवून दिलं आहे. त्याने आपल्या फलंदाजीने टी-20 संघात निवड होण्यासाठी पात्र असल्याचं सतत सिद्ध केलं आहे. पण तरीही 15 सदस्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र त्याला शुभमन गिल, आवेश खान, खलील अहमद यांच्यासह रिझर्व्ह खेळाडूंमध्ये ठेवण्यात आलं आहे. 

रिंकू सिंगला संघात स्थान न मिळाल्याने तो फार नाराज असल्याचं त्याचे वडील खानचंद्र सिंग यांनी सांगितलं आहे. तो फार दुखावला असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यांनी सांगितलं की, "फार अपेक्षा होत्या, त्यामुळे थोडं दु:खही झालं आहे. आम्ही मिठाई, फटाके आणले होते. तो 11 खेळाडूंमध्ये असेल असं आम्हाला वाटलं होतं".

रिंकूच्या सध्या काय भावना आहेत असं विचारण्यात आलं असता त्यांनी त्याचं मन मोडलं असल्याचा खुलासा केला. वर्ल्डकप संघात आपल्याला स्थान मिळालेलं नाही हे सांगण्यासाठी त्याने आपल्या आईला फोन केला होता अशी माहितीही त्यांनी दिली. "त्याचं मन मोडलं आहे. तो आपल्या आईशी बोलला आणि आपलं नाव 11 किंवा 15 मध्ये नाही असं सांगितलं. पण आपण जात आहो असं म्हणाला," असं त्याच्या वडिलांनी सांगितलं.

भारताचे माजी दिग्गज खेळाडू के श्रीकांत यांनीही रिंकू सिंगला 15 खेळाडूंमध्ये सहभागी न कऱण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करत नाराजी दर्शवली आहे. "त्याने दक्षिण आफ्रिकेत मॅच-विनिंग खेळी खेळली आहेत. अफगाणिस्तानविरुद्धचा तो सामना आठवा ज्यात रोहितने शतक झळकावले होते? भारताची स्थिती 4 बाद 22 धावा होती. तिथून त्यांनी 212 धावा केल्या होत्या. रिंकूने महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. त्याने भारताकडून खेळताना नेहमी आपलं सर्वस्व दिलं आहे. ही फार मूर्ख निवड आणि निर्णय आहे. तुम्हाला 4 फिरकी गोलंदाजांची गरज का आहे? तुम्ही काही लोकांना खूश करण्यासाठी निवड केली आहे आणि तुम्ही रिंकू सिंगला बळीचा बकरा बनवला आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.