Hardik Pandya fined 24 Lakhs : लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (MI vs LSG) यांच्यात आयपीएलचा 48 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात लखनऊने मुंबईचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात मुंबईने चांगली फलंदाजी केली नसल्याने सामना लखनऊने पारड्यात झुकवला होता. मात्र, मुंबईने गोलंदाजीची धार दाखवत सामना अखेरपर्यंत खेचण्याचा प्रयत्न केला. मार्कस स्टॉयनिसने सामन्याचं पारडं फिरवलं अन् लखनऊने सामना खिशात घातला. याचबरोबर आता मुंबई इंडियन्सच्या अडचणी देखील वाढल्या आहेत. मुंबई आता जवळजवळ प्लेऑफमधून बाहेर गेली आहे. तर दुसरीकडे कॅप्टन हार्दिक पांड्यावर बॅन लागण्याची शक्यता देखील आहे.
कॅप्टन हार्दिक पांड्या दोषी
लखनऊविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल कॅप्टन हार्दिक पांड्या दोषी आढळला. स्लो ओव्हर रेटमुळे सामना वेळेत संपला नाही. कोणताही सामना वेळेत संपवणं गरजेचं असतं. त्यामुळे बीसीसीआयने मंगळवारी संपूर्ण मुंबई इंडियन्स संघाला दंड ठोठावला आहे. कर्णधार पांड्याला 24 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, तर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेला नुवान तुषारा याला 6 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के रक्कम यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे.
चुकीला माफी नाही
मुंबई इंडियन्सचे अजून 4 सामने खेळायचे आहेत. कोलकाताविरुद्ध 2 सामने तर लखनऊ आणि हैदराबादविरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळायचा आहे. जर या सामन्यात पुन्हा हार्दिकने स्लो ओव्हर रेट राखला तर पुढील सामन्यात हार्दिक पांड्यावर बॅन लावला जाऊ शकतो. हा बॅन एका सामन्यासाठी असेल. हार्दिक पांड्याशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतलाही स्लो ओव्हर रेटसाठी दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ - इशान किशन (WK), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड, नुवान तुषारा, नमन धीर, शम्स मुलानी , देवाल्ड ब्रेविस, कुमार कार्तिकेय, श्रेयस गोपाल, हार्विक देसाई, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, क्वेना मफाका.