IPL 2021: 'या' कारणामुळे विराट कोहलीला व्हावं लागणार क्वारंटाइन

IPL तोंडावर असताना विराट कोहलीला व्हावं लागणार क्वारंटाइन, जाणून घ्या कारण 

Updated: Mar 30, 2021, 10:26 AM IST
IPL 2021: 'या' कारणामुळे विराट कोहलीला व्हावं लागणार क्वारंटाइन title=

मुंबई: IPL स्पर्धा तोंडावर आल्या असताना सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. IPL सामन्याआधी RCBचा कर्णधार विराट कोहलीला क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या संघाचे प्रशिक्षण शिबिर सुरू झाल्यानंतर 2 दिवसानंतर संघात सामील होईल. 

या हंगामात RCB विरुद्ध मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 9 एप्रिलला खेळला जाणार आहे. चेन्नईमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. रविवारी भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिज संपल्यानंतर विराट कोहलीनं बायो बबल सोडलं. त्यानंतर तो चेन्नईला RCB संघात सराव करण्यासाठी जाणार आहे. चेन्नईला पोहोचल्यानंतर कोहलीला बीसीसीआयने ठरवलेल्या कोरोना प्रोटोकॉलअंतर्गत हॉटेलच्या खोलीत सात दिवस क्वारंटाइन रहावं लागणार आहे. 

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि खेळाडूंच्या काळजीपोटी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बीसीसीआयनं काही गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. या गाइडलाइन्सनुसार विराट कोहलीला 7 दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. IPLशी जोडलेल्या सर्व सदस्यांना नियमानुसार बायो बबलमध्ये येण्याआधी 7 दिवस क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. 

याशिवाय विराट कोहलीची कोरोना टेस्टही करण्यात येणार आहे. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच तो संघातील सदस्यांसोबत सरावासाठी जाऊ शकणार आहे. IPL संपल्यानंतरही विराट कोहलीला आराम मिळणार नाही. याचं कारण म्हणजे नुकतेच इंग्लंड विरुद्धचे तीन फॉरमॅट संपले असले तरी IPL नंतर पुन्हा टीम इंडियाला 18 जूनला इंग्लंड दौऱ्यावर जायचं आहे. त्यानंतर टी 20 वर्ल्ड कप असणार आहे.