मुंबई : आयपीएल 2021 मध्ये रविवारी चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) पराभव केला. सीएसकेच्या या विजयाचा खरा हिरो अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ठरला. त्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग या खेळाच्या तीनही भागात महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रथम फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करत त्याने 28 चेंडूत नाबाद 62 धावा फटकावल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर 37 धावा फटकावून संघाला मजबूत धावसंख्या करून दिली. त्यानंतर गोलंदाजीकरत त्याने 4 ओव्हरमध्ये पहिली ओव्हर मॅडन ओव्हर देऊन, केवळ 13 धावा दिल्या आणि 3 विकेट्स घेतले.
रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) जे विकेट्स घेतले ते सध्या सुध्या फलंदाजाचे घेतले नाही, तर त्याने ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सचा विकेट घेऊन आरसीबीला झटका दिला आहे. तसेच फिल्डिंगमध्ये त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याने डॅन ख्रिश्चनला रन आऊट केले आहे. या कामगिरीमुळे त्यांला 'मॅन ऑफ दी मॅच' मिळाला आहे.
या सगळ्यानंतर पुन्हा एकदा रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) मिळालेल्या 'सर जडेजा' या पदवीची चर्चा सुरू झाली. त्याचा खेळ पाहूण लोकं म्हणू लागले की, "यासाठी या डाव्या हाताने खेळणाऱ्या खेळाडूला 'सर रवींद्र जडेजा' असे म्हणतात." त्यातच भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्रीही त्याची प्रशंसा करण्यापासून मागे राहिले नाहीत. त्यांनी जडेजाच्या कौतुका बरोबर एक खुलासा देखील केला आहे.
महेंद्रसिंग धोनी रवींद्र जडेजाला मस्करीत 'सर' बोलला होता, तेव्हापासून ही उपमा जडेजाशी जोडली गेली आहे. जडेजा जेव्हा ही काही चांगली कामगिरी करतो तेव्हा त्याच्या सोशल मीडियावर त्याला 'सर' म्हणून सगळे संबोधतात. परंतु टीम इंडियामध्ये त्याला वेगळ्या नावाने संबोधले जाते, असे टीमचे मुख्य कोच म्हणाले.
सीएसके आणि आरसीबीच्या सामन्यानंतर शास्त्री यांनी ट्वीट केले की, "म्हणून आम्ही त्याला गॅरी जडेजा म्हणतो, उत्कृष्ट प्रतिभावंत खेळाडू." जडेजाच्या नावापुढे गॅरी लावण्याच्या या गोष्टीचा शास्त्री यांनी खुलासा केला आहे. गॅरी सोबर्स हा वेस्ट इंडीजमधील महान अष्टपैलू खेळाडू आहे.
Not for nothing we call him Gary Jadeja. Sheer brilliance - @imjadeja @ChennaiIPL #IPL2021 #CSKvRCB pic.twitter.com/UMfTw3y7SC
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) April 25, 2021
सामन्या दरम्यान फलंदाजी करणाऱ्या सुनील नारायणने चौका मारण्यासाठी चेंडू त्याच्या ऑफसाईडच्या दिशेने मारला. पण त्याक्षणी रवींद्र जडेजाने त्यावर झेप घेतली आणि सहजतेने चेंडू पकडला. जडेजाने ती कठीण कॅच इतक्या सहजतेने पकडली, हे पाहून कॅामेंन्टेटर सुनील गावस्कर थक्कं झाले. त्यामुळे सुनील गावस्कर जडेजाला "जादूगर जडेजा" (Jadugar Jadeja) बोलू लागले. खरे पाहाता जडेजा डाव्या हाताने खेळणारा खेळाडू आहे, परंतु त्याने त्याच्या चुकिच्या बाजुला म्हणजेच उजव्या बाजुला ही कॅच पकडली आहे.
सामन्यानंतर आरसीबी आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही जडेजाचे कौतुक केले. तो म्हणाला. "या एका खेळाडूने आम्हाला पूर्णपणे पराभूत केले आहे. आज प्रत्येकाने त्याची क्षमता पाहिली. त्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी केल्याचा मला आनंद आहे. दोन महिन्यांनंतर तो भारतीय संघाकडून खेळेल आणि आपल्या मुख्य खेळाडूला चांगले प्रदर्शन करताना पाहून मला नेहमीच दिलासा मिळतो."