राजस्थान टीमची ऑफर आमिर खाननं स्वीकारली, काय म्हणाला पाहा व्हिडीओ

आमिर खाननं स्वीकारली राजस्थान रॉयल्सची ऑफर, पुढच्या वर्षी दिसणार मैदानात

Updated: May 25, 2022, 11:21 AM IST
राजस्थान टीमची ऑफर आमिर खाननं स्वीकारली, काय म्हणाला  पाहा व्हिडीओ title=

मुंबई : आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग आहे. जगभरातील खेळाडू या लीगमध्ये सहभागी होतात. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सामने शेवटच्या टप्प्यात आले आहेत. याच वेळी आमिर खान आयपीएलच्या अंतिम सामन्यात होस्ट म्हणून दिसणार असल्याची चर्चा आहे. या सगळ्यात आता आमिर खान क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसणार का अशीही एक चर्चा रंगली आहे. 

राजस्थान रॉयल्स टीमने आमिर खानला टीममधून खेळण्याची ऑफर दिली. त्यावर आमिर खानने एक व्हिडीओ मेसेज दिला. त्यानंतर सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली.

राजस्थान रॉयल्सने एक मीम शेअर केलं. या मीममध्ये राजस्थानने आमिर खानला अकरावा खेळाडू असल्याचं म्हटलं आहे. त्यावर आमिर खानने एक व्हिडीओ शेअर केला. 

राजस्थानने मला ही ऑफर दिल्याबद्दल मी खूपच आभारी आहे. पण मी ऑलराउंडर आहे. यावेळी मी जर टीममध्ये आलो तर टीम अधिक मजबूत होईल. पण मी पुढच्यावेळी नक्की येईन असं मजेशीर पद्धतीनं आमिर खाननं म्हटलं आहे.

यंदाच्या मोसमात गुजरात टीम नवी असूनही सर्वोत्तम कामगिरी केली. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर राजस्थान आहे. आयपीएल 2022 चा पहिला क्वालिफायर राजस्थान आणि गुजरात यांच्यात खेळवण्यात आला.