LIVE मॅचमध्ये OUT होताच सीनियर खेळाडूवर संतापला 20 वर्षीय रियान पराग

वाइड बॉलवर OUT होताच सीनियर खेळाडूवर संतापला...क्रिकेटप्रेमींनी घेतली रियान परागची शाळा

Updated: May 25, 2022, 09:48 AM IST
LIVE मॅचमध्ये OUT होताच सीनियर खेळाडूवर संतापला 20 वर्षीय रियान पराग title=

मुंबई : गुजरात विरुद्ध राजस्थान मंगळवारी झालेल्या सामन्यात शेवटच्या ओव्हरने संपूर्ण खेळाचं चित्रच बदलून गेलं. राजस्थानचा पराभव झाला असून गुजरातने बाजी मारली आहे. या सामन्यात रियान परागचं जरा चुकलंच. राजस्थानचा खेळाडू रियान पराग सीनियर खेळाडू आर अश्विनवर संतापला. 

मैदानात झालेल्या या ड्रामानंतर रियान पराग सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला.  रियान परागचं वागण क्रिकेटप्रेमींना अजिबात आवडलं नाही. 20 वर्षांच्या रियानने आर अश्विनवर आवाज चढवला

या 20 वर्षीय खेळाडूची वृत्ती पाहून क्रिकेटप्रेमी संतापले आणि सोशल मीडियावर त्याच्यावर झालेल्या गैरवर्तणुकीसाठी त्याला ट्रोल केलं जात आहे. 

राजस्थान रॉयल्सच्या (RR) डावात रियान पराग नॉन-स्ट्राइक एंडवरून शेवटच्या षटकात स्ट्राइक घेण्यासाठी धावला, पण रविचंद्रन अश्विन त्याच्या जागेवरून अजिबात हलला नाही. त्यामुळे रियान पराग वाइड बॉलवर आऊट झाला. 

रियान परागच्या वर्तवणुकीवरून त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. गुजरातने 7 विकेट्सने राजस्थानचा पराभव केला आहे. गुजरात यंदाच्या हंगामात चांगलाच स्ट्राँग आहे. त्यामुळे ट्रॉफीचा दावेदारही मानला जात आहे.