भारत वि. दक्षिण आफ्रिका: तिसऱ्या टी-20 आधी आली बॅडन्यूज

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान शनिवारी तिसरा टी-20 सामना रंगणार आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 24, 2018, 01:05 PM IST
भारत वि. दक्षिण आफ्रिका: तिसऱ्या टी-20 आधी आली बॅडन्यूज title=

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान शनिवारी तिसरा टी-20 सामना रंगणार आहे.

तिसरा सामना

केपटाउनमध्ये हा सामना तिसरा सामना होणार आहे. भारत या सामन्यात विजयासह सीरीजवर ही कब्जा करणार आहे. भारताने पहिला सामना जिंकत सीरीजमध्ये आघाडी घेतली पण दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आणि सीरीजमध्ये 1-1 ने बरोबरी केली.

पावसाचं सावट

तिसऱ्या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. ज्यामुळे टॉस कोण जिंकतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण जो संघ टॉस जिंकेल निर्णय त्याच्या बाजुने लागू शकतो. याआधी देखील एका सामन्यात पावसाने सामन्याचा कल बदलला. ज्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता भारत देखील टॉस जिंकून तशा पद्धतीने रणनीती आखेल.