अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये द्रविडला होती ही चिंता

पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वात भारतानं अंडर १९ वर्ल्ड कपवर नाव कोरलं.

Updated: Feb 6, 2018, 05:50 PM IST
अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये द्रविडला होती ही चिंता title=

मुंबई : पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वात भारतानं अंडर १९ वर्ल्ड कपवर नाव कोरलं. राहुल द्रविडचं प्रशिक्षण लाभलेल्या भारतीय टीमनं चौथ्यांदा अंडर १९ वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला. पण वर्ल्ड कपच्यावेळी राहुल द्रविडला वेगळीच चिंता सतावत होती. आयपीएलच्या लिलावादरम्यानचा एक आठवडा तणावपूर्ण होता. हा संपूर्ण आठवडा मी चिंतेत होतो, असं द्रविड म्हणाला आहे.

आयपीएलच्या लिलावावर लक्ष देण्यापेक्षा अंडर १९ वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला राहुल द्रविडनं खेळाडूंना दिला होता. आयपीएलचा लिलाव होणार हे सगळ्यांना माहिती होतं. याबद्दल आम्हाला माहिती नाही, असा दिखावा करण्यात काहीच अर्थ नव्हता. पण आयपीएल लिलाव नेहमीच येईल पण वर्ल्ड कप कधीतरीच येतो, असं मी मुलांना सांगितलं. जवळचा फायदा बघू नका तर तुमच्या क्रिकेटच्या भविष्यावर लक्ष केंद्रीत करा, असा सल्ला खेळाडूंना दिल्याचं राहुल द्रविड म्हणाला.