म्हणून राहुल द्रविड रांगेत उभा राहिला

भारताचा क्रिकेटपटू राहुल द्रविड त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये नेहमीच जंटलमन म्हणून गौरवला गेला.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Nov 24, 2017, 07:41 PM IST
म्हणून राहुल द्रविड रांगेत उभा राहिला title=

बंगळुरू : भारताचा क्रिकेटपटू राहुल द्रविड त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये नेहमीच जंटलमन म्हणून गौरवला गेला. फक्त क्रिकेटच्या मैदानातच नाही तर खासगी आयुष्यामध्येही राहुल द्रविड जंटलमनच आहे, हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. राहुल द्रविडचा रांगेत उभा असलेला एक फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

विज्ञान प्रदर्शनाच्या रांगेत उभा असलेला हा राहुल द्रविडचा फोटो आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी राहुल द्रविड त्याच्या मुलांसोबत आला होता. अत्यंत साधेपणाने इतर पालकांसारखाच राहुल द्रविड रांगेमध्ये उभा होता. कोणताही शो ऑफ नाही, पेज 3 अॅटिट्यूट नाही, सेलिब्रिटी असल्याचा आविर्भावही नाही. इतर पालकांसारखाच तो ही रांगेमध्ये उभा आहे. हे कौतुकास्पद आहे, असं कॅप्शन टाकून हा फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.