प्रकाश पदुकोण यांना जीवनगौरव पुरस्कार...

भारतीय बॅडमिंटन महासंघातर्फे यंदापासून जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे आणि या जीवनगौरव पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत ऑल इंग्लंड स्पर्धा विजेते पहिले भारतीय खेळाडू प्रकाश पदुकोण.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 12, 2017, 08:58 AM IST
प्रकाश पदुकोण यांना जीवनगौरव पुरस्कार...  title=

कोची : भारतीय बॅडमिंटन महासंघातर्फे यंदापासून जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे आणि या जीवनगौरव पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत ऑल इंग्लंड स्पर्धा विजेते पहिले भारतीय खेळाडू प्रकाश पदुकोण. नवी दिल्ली येथे लवकरच हा सोहळा संपन्न होईल, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष हिमंता बिस्वा शर्मा यांनी दिली. 

बंगळुर येथे झालेल्या महासंघाच्या कार्यकारणीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्याचा  ठराव संमत झाला. पदुकोण यांनी १९८० मध्ये ऑल इंग्लंड स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. हे विजेतेपद पडकवणारे ते पहिले भारतीय खेळाडू होते. त्याचबरोबर १९७८ सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक कमावले होते तर १९८३ मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत ते कांस्यपदक मानकरी ठरले होते.