2 आठवडे 18 सामने आणि पॉईंट टेबलवरचं बदलेलं समीकरण, पाहा

बंगळुरुच्या विजयानं बदलली पॉईंट टेबलवरची क्रमवारी, पाहा कोण टॉपवर

Updated: Apr 10, 2022, 01:19 PM IST
2 आठवडे 18 सामने आणि पॉईंट टेबलवरचं बदलेलं समीकरण, पाहा  title=

मुंबई : यंदाच्या आयपीएलची दणक्यात सुरुवात झाली आहे. 10 टीममध्ये ट्रॉफीसाठी चुरशीची लढत आहे. दोन आठवडे आणि जवळपास 18 सामने झाले आहेत. या सामन्यांचे निकाल खूपच वेगळे आहेत. दिल्ली, मुंबई, चेन्नई टीम यंदा जोरदार कामगिरी करताना दिसत नाही. 

राजस्थान, कोलकाता, बंगळुरू, लखनऊ, गुजरात टीम सध्या टॉपमध्ये राहण्यासाठी झटत आहेत. प्ले ऑफपर्यंत या टीम जाऊ शकतील असे पहिल्या टप्प्यातील अंदाज सांगत आहेत. बंगळुरू विरुद्ध मुंबई झालेल्या सामन्यात फाफ ड्यु प्लेसीसच्या टीमने विजय मिळवला. बंगळुरुच्या विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये कोणते बदल झाले जाणून घेऊया. 

4 सामने खेळून कोलकाता टीम पहिल्या स्थानावर आहे. 4 पैकी 3 सामने जिंकले तर 1 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. दुसऱ्या स्थानावर गुजरात आणि तिसऱ्या स्थानावर बंगळुरू आहे. बंगळुरू आणि लखनऊ टीमने 4 सामने खेळून प्रत्येकी 1 सामना गमवला आहे. 

गुजरात टीमने तिन्ही सामने खेळून जिंकले आहेत. लखनऊने 4 पैकी 3 जिंकले आहेत. त्या खालोखाल राजस्थान टीम आहे. 3 पैकी 2 सामने जिंकले असून 1 पराभूत झाले आहेत. 

चेन्नई सुपरकिंग्स खालून पहिल्या स्थानावर आहे. मुंबई इंडिन्स 9 व्या स्थानावर आहे. दोन्ही टीमने यंदाच्या मोसमात एकही मॅच जिंकली नाही. तर 8 व्या स्थानावर हैदराबाद आहे. ज्याने 3 सामने खेळून 1 जिंकला आहे तर दोन गमवले आहेत.