दुबई : ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या फॉर्मबाबत सातत्याने चर्चा होत आहेत. आयपीएल 2021च्या दुसऱ्या टप्प्यात फक्त दोन सामने खेळलेल्या वॉर्नरवर टीका होताना दिसतेय. दरम्यान आता वॉर्नरनेच या टीकेचं आश्चर्य व्यक्त केलं आहे. ज्यांनी त्याच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली त्यांचं हसू येत असल्याचं वॉर्नरने म्हटलंय.
ऑस्ट्रेलियाच्या या स्फोटक डावखुऱ्या फलंदाजाने बुधवारी आपल्या फॉर्मबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. डेव्हिड वॉर्नर म्हणते "मला वाटतं की लोक माझ्या फॉर्मबद्दल बोलत आहेत जे खूप मजेदार आहे. मी याबाबत फार हसू येतं कारण मी क्वचितच क्रिकेट सामना खेळलोय."
आयपीएलचा संदर्भ देताना डेव्हिड वॉर्नर म्हणाला, "आयपीएलचं उदाहरण घेऊ ज्यात माझे दोन सामने झाले आणि त्यानंतर मला इतर सर्व तरुणांना संधी द्यायची होती."
गुरुवारच्या श्रीलंकेविरुद्धच्या गट सामन्याआधी तो म्हणाला, "माझा दृष्टिकोन बरोबर आहे, सराव सामन्यांना काही कारणास्तव सराव सामने म्हणतात. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढच्या सामन्यात मी माझ्या लयीत होतो आणि चांगला खेळत होतो."
वॉर्नर पुढे म्हणाला, "मी नेटमध्येही चांगली कामगिरी करत असून मोठी खेळी खेळण्यास तयार आहे. सध्या मी सिंथेटिक विकेट्सवर सराव करतोय. अॅरॉन फिंचचा उल्लेख करताना वॉर्नर म्हणाला की, मला वाटतं फिंचनेही हेच केलं असेल.