या संशयास्पद मॅचची आयसीसी चौकशी करणार, फिक्सिंगचा संशय

मॅच फिक्सिंगचं भूत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मानगुटीवर बसलं आहे. 

Updated: Jan 31, 2018, 06:04 PM IST
या संशयास्पद मॅचची आयसीसी चौकशी करणार, फिक्सिंगचा संशय  title=

दुबई : मॅच फिक्सिंगचं भूत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मानगुटीवर बसलं आहे. युएईमधल्या ऑल स्टार्स लिगमधल्या मॅचमध्ये खेळाडूंनी अक्षरश: विकेट फेकल्याचं दिसून आल्यावर आयसीसीनं चौकशीचे आदेश दिले आहेत.

या मॅचची चौकशी सुरु असल्याचं आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख ऍलेक्स मार्शल यांनी सांगतिलं आहे. क्रिकेट प्रामाणिक राहावं यासाठी आम्ही काम करत आहोत. या मॅचमधल्या खेळाडू आणि संबंधित व्यक्तींशी आम्ही बोलत आहोत. यापेक्षा अधिक माहिती मी देऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया मार्शल यांनी दिली आहे. मुख्य म्हणजे या लिगला यूएई क्रिकेट बोर्डानं परवानगी दिली आहे.

संशयास्पद असलेली ही मॅच दुबई स्टार्स आणि शारजाह वॉरियर्समध्ये खेळवण्यात आली. संशयास्पदरित्या रन आऊट झालेल्या या मॅचमध्ये वॉरियर्सना विजयासाठी १३६ रन्सची आवश्यकता होती पण त्यांचा फक्त ४६ रन्सवर ऑल आऊट झाला.

संशयास्पदरित्या आऊट झाली टीम, पाहा व्हिडिओ