एका कॅचनं ओढला हातातोंडाचा घास, पुढच्या 8 बॉलमध्ये 'त्याने' अख्खी बाजी पलवटली

कॅच सुटल्यानं मैदानात जीवदान मिळालं आणि पुढच्या 8 बॉलमध्ये त्याने अक्षरश: धावांचा पाऊस पाडला.... पाहा कोण आहे तो पंजाबच्या विजयाचा 'किंग'

Updated: Mar 28, 2022, 08:11 AM IST
एका कॅचनं ओढला हातातोंडाचा घास, पुढच्या 8 बॉलमध्ये 'त्याने' अख्खी बाजी पलवटली title=

मुंबई : बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाब संघाच्या स्टार खेळाडूनं कमाल केली. बंगळुरूने 206 धावांचं लक्ष्य विजयासाठी पंजाबसमोर ठेवलं. 10 धावा झाल्यानंतर त्याने मारलेल्या शॉटवर तो आऊट होता होता वाचला. बंगळुरू संघाच्या खेळाडूंनी कॅच सोडल्यामुळे त्याला मैदानात जीवदान मिळालं. 

मिळालेल्या संधीचं त्याने सोनं करत पंजाब संघाला विजय मिळवून दिला. हा खेळाडू शिखर धवन किंवा मयंक अग्रवाल नाही तर ओडियन स्मिथ आहे. ओडियनने शाहरुख खानसोबत खेळून बंगळुरूच्या हातून विजय खेचून आणला. 

बंगळुरूची फलंदाजी चांगली होती मात्र एका चुकीची शिक्षा संघाला मिळाली. ओडियनची तुलना मायकल वॉनने रॉकेटशी केली आहे. सिराजने टाकलेल्या बॉलवरही ओडियननं अगदी सहज षटकार ठोकला. त्याच्या तुफान फलंदाजीमुळे पंजाबला लक्ष्य गाठणं सोपं झालं.

ओडियनच्या 10 धावा झाल्या होत्या तेव्हा त्याचा कॅच अनुजने पकडताना सोडला. त्यामुळे संपूर्ण खेळ बदलला. ओडियननं मिळालेल्या संधीचं सोनं करत 8 बॉलमध्ये एक चौकार आणि 3 षटकार ठोकत 25 धावा करून नाबाद राहिला. पंजाब संघाला त्याने बंगळुरू विरुद्ध विजय मिळवून दिला.