Manu Bhaker Won Bronze in Paris Olympics: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मेडलचं खातं उघडलं आहे. नेमबाज मनू भाकरने (Manu Bhaker) भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक मिळवून दिलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) जबरदस्त कामगिरी करत तिने कांस्यपदक (Bronze Medal) जिंकलं आहे. 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत 227.7 गुणांसह तिने पदक आपल्या नावावर केलं. नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
पदक जिंकल्यानंर मनु भाकरने आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी तिला स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात डोक्यात नेमका काय विचार सुरु होता याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर तिने मी श्रीकृष्णाची भक्त असून शेवटच्या क्षणी त्यांनी अर्जुनाला दिलेला संदेश आठवत होते असं सांगितलं. मी रोज गीता वाचते आणि कर्म करण्यावर विश्वास ठेवते असं तिने म्हटलं.
तिने सांगितलं की, "मी गीता फार वाचते. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जूनला फक्त आपल्या कर्मावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं होतं. कर्म करा फळाची चिंता करु नको हेच कृष्णाने सांगितलं असून मी त्याचाच विचार करत होते". मी फक्त माझी सर्वोच्च कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रीत करते. मी माझ्या नशिबावर तर नियंत्रण ठेवू शकत नाही असंही तिने सांगितलं.
Manu Bhaker on how she handled pressure of the finals:
"I read a lot of Bhagavad Gita where Lord Krishna says to focus on the Karma and not the outcome of Karma".#Olympics | #ManuBhaker
pic.twitter.com/tnMW867gCv— Johns (@JohnyBravo183) July 28, 2024
पुढे ती म्हणाली, "टोकियो ऑलिम्पिक माझ्यासाठी फार निराशाजनक राहिला. पण जे झालं ते झालं. हे पदक आपल्या सर्वांसाठी आहे. हे नेहमी टीम वर्क असतं. मी भारतासाठी हे पदक जिंकण्याचं फक्त एक माध्यम आहे".
22 वर्षीय मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिक 2024 शूटिंग स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल, 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक आणि महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत सहभागी आहे. 21 सदस्यीय भारतीय नेमबाजी संघातील ती एकमेव खेळाडू आहे जी अनेक वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेते.
2023 आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात पाचव्या स्थानावर राहून मनूने भारतासाठी पॅरिस 2024 ऑलिम्पिकमद्ये स्थान मिळवलं होतं. ISSF विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी मनू भाकर ही सर्वात तरुण भारतीय आहे. गोल्ड कोस्ट 2018 मधील महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत ती कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन देखील आहे, जिथे तिने CWG रेकॉर्डसह सर्वोच्च पदक जिंकले