Sri Lanka vs India 1st T20I : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात श्रीलंकेचा फिरकीपटू कामिंडू मेंडिस (Kamindu Mendis) याने दोन्ही हाताने बॉलिंग करून सर्वांना चकीत केलं. जेव्हा सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत भारतासाठी फलंदाजी करत होते, तेव्हा कामिंडूने सूर्यकुमार यादवला त्याच्या डाव्या हाताने गोलंदाजी केली. मात्र, कामिंडूला डावात फक्त 1 ओव्हर टाकली ज्यामध्ये त्याने 9 रन्स दिले. मात्र यावेळी त्याला एकही विकेट घेता आली नाही. मात्र, कोणत्याही गोलंदाजाला दोन्ही हातांनी गोलंदाजी करता येते का? अशी बॉलिंग नियम बाह्य असते का? आयसीसीचा नियम (ICC rules) काय सांगतो? पाहा सविस्तर
आयसीसीच्या 21.1.1 नियमानुसार, बॉलर उजव्या हाताने किंवा डाव्या हाताने, ओव्हर द विकेट की राऊंड द विकेट गोलंदाजी करायचा आहे की नाही हे पंचाने तपासलं पाहिजे आणि स्ट्रायकरला कळवलं पाहिजे.
जर गोलंदाज अंपायरला बॉलिंग अॅक्शनमध्ये बदल सूचित करण्यास अयशस्वी ठरला, तर तो बॉल अयोग्य मानला जातो आणि अंपायर कॉल करून नो-बॉलचा संकेत दिला जाईल, असा आयसीसीचा नियम आहे.
दोन्ही हातांनी बॉलिंग करणारा कामिंडू मेंडिस पहिला गोलंदाज नव्हता. त्याच्याआधी श्रीलंका गोलंदाज हशिन तिलकरत्ने याने देखील एकाच ओव्हरमध्ये दोन्ही हाताने गोलंदाजी केली आहे. तर हनीफ मोहम्मद याने देखील दोन्ही हातांनी बॉलिंग केली होती. मात्र, त्याचा पुरावा कुठेही सापडत नाही.
श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो.