Asia Cup:माझ्या मुलीने तिरंगा फडकावला होता, पाकिस्तानी खेळाडूचा मोठा दावा

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान माझ्या मुलीने तिरंगा फडकावला, असा दावा करणारा पाकिस्तानचा 'हा' खेळाडू कोण? 

Updated: Sep 11, 2022, 04:05 PM IST
 Asia Cup:माझ्या मुलीने तिरंगा फडकावला होता, पाकिस्तानी खेळाडूचा मोठा दावा title=

दुबई : आशिया कपचा (Asia Cup 2022) अंतिम सामना आज पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये (pakistan vs sri lanka) पार पडणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता लागलीय. या सामन्याआधीच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने मोठा दावा केला आहे. भारत-पाकिस्तान (india vs pakistan) सामन्यादरम्यान माझ्या मुलीने तिरंगा फडकावल्याचा दावा पाकिस्तानच्या माजी खेळाडूने केला आहे. या खेळाडूच्या दाव्याची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.   
 
माझ्या धाकट्या मुलीने भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान भारताचा झेंडा फडकावला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना ४ सप्टेंबर रोजी दुबईत खेळला गेला होता, असा दावा पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने (shahid afridi) केला आहे.  

शाहिद आफ्रिदी (shahid afridi) म्हणाला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी आलेले 90 टक्के चाहते हे भारतीय फॅन्स होते. यावेळी  परिस्थिती अशी होती की तिथे पाकिस्तानी झेंडे उपलब्ध नव्हते, त्यामुळे माझी धाकटी मुलगी हातात भारताचा झेंडा फडकावत होती. त्यावेळी माझी पत्नी मला स्टेडियममधून सतत व्हिडिओ आणि फोटो पाठवत होती, असे देखील तो म्हणालाय.  

शाहिद आफ्रिदी (shahid afridi) पुढे म्हणतो, हे व्हिडिओ अजूनही त्याच्याकडे आहेत. मी हा व्हिडिओ ट्विट करायचा की नाही याचा विचार करत होतो. मात्र त्याचवेळी  पाकिस्तानने रोमहर्षक सामन्यात भारताचा 5 गडी राखून पराभव केला होता, असे तो म्हणतोय. 

दरम्यान आशिया कपच्या 2022 च्या साखळी टप्प्यातील सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने सुपर-4 फेरीत भारतीय संघाचा 5 गडी राखून पराभव करून अंतिम सामन्यात स्थान पटकावले होते. 

आज 11 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तान आणि श्रीलंका (pakistan vs sri lanka) यांच्यातील अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात बाजी मारून कोणता संघ आशिया कपवर नाव कोरतो,याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.