भारताविरूद्धच्या सामन्यामध्ये इंग्लंडच्या क्यूट क्रिकेटरने केला डेब्यू, स्माईलवर फॅन्स झाले फिदा!

लॉरेन बेलच्या सौंदर्यापुढे अभिनेत्रीही वाटेल फिकी, कोण आहे लॉरेन बेल?

Updated: Sep 11, 2022, 02:57 PM IST
भारताविरूद्धच्या सामन्यामध्ये इंग्लंडच्या क्यूट क्रिकेटरने केला डेब्यू, स्माईलवर फॅन्स झाले फिदा! title=

Lauren Katie Bell : भारतीय महिला संघाला इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात 9 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात इंग्लंडची 21 वर्षीय खेळाडू लॉरेन बेलने टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं असून तिची मोठी चर्चा होताना दिसत आहे. कोण आहे लॉरेन बेल?, जाणून घ्या. 

21 वर्षीय लॉरेन बेल ही एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून ओळखली जाते. ती बाउन्सर फेकण्यात माहीर असून तिची उंची 6 फूट आहे, म्हणूनच तिला जवळचे 'द शार्ड'ही म्हणतातं. लॉरेन बेलने आतापर्यंत इंग्लंड महिला क्रिकेट संघाकडून 1 कसोटी, 2 एकदिवसीय सामने आणि 1 टी-20 सामना खेळला आहे. लॉरेन बेलने कसोटीत 2 आणि एकदिवसीय सामन्यात 1 विकेट घेतली आहे. 

इंग्लंडच्या महिलांच्या देशांतर्गत क्रिकेटबद्दल बोलायचं झाल्यास, लॉरेन बेल बर्कशायर (Berkshire), मिडलसेक्स (Middlesex), साऊर्थन वायपर्स (Southern Vipers) आणि साऊर्थन ब्रेव्ह (Southern Brave) या संघांसाठी खेळली आहे. लॉरेन बेल दिसायला खूप सुंदर असून तिच्या स्माईलवर अनेक फॅन्स फिदा आहेत. इंग्लंड संघात निवड झाल्यावर तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.