Video: भर मैदानात आमने-सामने आले वॉर्नर आणि आफरीदी, आणि...

या घटनेचा व्हिडीयोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघंही खेळाडू एकमेकांकडे रागाने पाहत असल्याचं दिसतंय.

Updated: Mar 24, 2022, 08:47 AM IST
Video: भर मैदानात आमने-सामने आले वॉर्नर आणि आफरीदी, आणि... title=

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यात लाहोरमध्ये तिसरा टेस्ट सामना सुरु आहे. दरम्यान या टेस्टमध्ये एक असा प्रकार घडलाय ज्याची सर्व ठिकाणी चर्चा होतेय. भर मैदानात ऑस्ट्रेलिया फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन शाह अफरीदी एकमेकांशी भिडताना दिसले. या घटनेचा व्हिडीयोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघंही खेळाडू एकमेकांकडे रागाने पाहत असल्याचं दिसतंय.

क्रिजवरच भिडले वॉर्नर-अफरीदी

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर आणि शाहीन शाह अफरीदी या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. आफरीदी ज्यावेळी गोलंदाजी करत होता तेव्हा वॉर्नरने त्याचा बॉल डिफेंस केला. फॉलो-थ्रू पूर्ण झाल्यानंतर शाहीन आफरीदी थेट डेव्हिड वॉर्नरकडे पोहोचला. यावेळी ते दोघं इतके जवळ आले की एकमेकांकडे रागाने पाहू लागले.

सोशल मीडियावर व्हायरल झालाय व्हिडीयो

शाहीन आफरीदी वॉर्नरकडे पोहोचल्यानंतर वॉर्नरनेही त्याला डोळे दाखवले. मात्र हा सर्व प्रकार मस्करीत घेत दोन्ही खेळाडू हसत हसत बाजूला झाले. दरम्यान यावेळी त्या एका क्षणाचा फोटो व्हायरल झाला आहे. कारण यामध्ये वॉर्नरची उंची कमी आहे आणि आफरीदीची उंच असल्याने हा फोटो फारच व्हायरल झाला. 

24 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर

तब्बल 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर आली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 1998 साली पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया टीम 2022 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. 

या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दोन टेस्ट सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे आता हा तिसरा टेस्ट सामना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.