पाकिस्तानसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या सेमीफायलमध्ये पाकसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान आहे. 

Updated: Jun 14, 2017, 06:45 PM IST
पाकिस्तानसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान  title=

कार्डिफ : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या सेमीफायलमध्ये पाकसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान आहे. 

पाकिस्तानच्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ २११ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून ज्यो रुटने सर्वाधिक ४६ धावा केल्या. तर सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रॉने ४३ धावा केल्या.

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी या सामन्यात चांगली कामगिरी करताना इंग्लंडचा डाव २११ धावांवर रोखला. पाकिस्तानच्या हसन अलीने तीन विकेट घेतल्या. तर जुनैद खान आणि रमन रईसने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.