T-20 वर्ल्डकप : भारतात सामना खेळण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रयत्न सुरू....म्हणाले...

भारतात टी-२० वर्ल्डकपचं आयोजन पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये करण्यात येणार आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण 

Updated: Oct 21, 2020, 11:11 AM IST
T-20 वर्ल्डकप : भारतात सामना खेळण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रयत्न सुरू....म्हणाले... title=

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रयत्न आहेत, पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात टी-२० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या सामन्यांसाठी पाकिस्तान टीमच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने  वीजा द्यावा मिळवून देण्याचं आश्वासन जानेवारी २०२१ पर्यंत द्यावं.

पीसीबीच्या सीईओंनी हे देखील स्पष्ट केलं आहे की, भविष्यात भारत-पाकिस्तानमध्ये सीरीज खेळवली जाईल, अशी कोणतीही शक्यता नाही. 

भारतात टी-२० वर्ल्डकपचं आयोजन पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये करण्यात येणार आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंध पाहून, पीसीबीने आयसीसीकडून आश्वासन मागितलं आहे की, पाकिस्तानच्या खेळाडूंना आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना वीजा देण्याची सोय करावी.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी पुढे म्हटलं आहे की, आयसीसीने हे पाहायचं आहे, आम्ही फक्त चिंता व्यक्त केली. असं म्हणतात की, आयोजक देशाने वीजा आणि राहण्याची सोय ही इतर देशातील टीमची करायची असते. 

खान पुढे म्हणाले, आता टी२० वर्ल्डकपसाठी पाकिस्तान टीम खेळणार आहे, आणि हे सामने भारतात होणार आहेत, आयोजक भारत आहे, तर पाकिस्तान टीमच्या खेळाडूंचा वीजा जानेवारीपर्यंत मिळवून द्यावा, अशी मागणी आमची आयसीसीकडे आहे. आता आयसीसी या बाबतीत बीसीसीआयच्या संपर्कात आहे, कारण महत्त्वाच्या सूचना आणि याबाबतीचा निर्णय हा त्यांना भारत सरकारकडूनच मिळेल.

खान म्हणतात, आयसीसीची देखील भूमिका आहे की, जगातील सर्वच क्रिकेट टीमचा सहभाग टी२० वर्ल्डकपमध्ये व्हावा. यासाठी लागणारा वीजा आम्हाला डिसेंबर-जानेवारीपर्यंत उपलब्ध व्हावा असं आम्ही आयसीसीला सांगितलं आहे. आता बीसीसीआयच्या माध्यमातून भारत सरकारकडे केले जाणारे प्रयत्न आणि भारत सरकार यावर काय निर्णय घेणार यावर हे सर्व अवलंबून आहे.