Temba Bavuma: टेम्बा बावुमाची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णयाने द.आफ्रिकेचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं

AUS vs SA: डेव्हिड मिलरच्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीमने स्कोअरबोर्डवर 212 रन्सपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलिया टीमलाही हे आव्हान गाठणं सोप्पं झालं नाही. शेवटी पडझड होऊनही कांगारूंनी 3 विकेट्स राखून विजय मिळवत अंतिम फेरीचे तिकीट मिळवलं.

सुरभि जगदीश | Updated: Nov 17, 2023, 10:04 AM IST
Temba Bavuma: टेम्बा बावुमाची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णयाने द.आफ्रिकेचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं title=

AUS vs SA: वर्ल्डकपमध्ये दुसरी सेमीफायनल दक्षिण आफ्रिका विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवण्यात आली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अवघ्या 3 विकेट्लने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचं यंदाच्या वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर ऑस्ट्रेलियाला फायनलचं तिकीट मिळवण्यात मोठं यश आलंय. दरम्यान या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाच्या एका चुकीमुळे दक्षिण आफ्रिकेला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 

डेव्हिड मिलरच्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीमने स्कोअरबोर्डवर 212 रन्सपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलिया टीमलाही हे आव्हान गाठणं सोप्पं झालं नाही. शेवटी पडझड होऊनही कांगारूंनी 3 विकेट्स राखून विजय मिळवत अंतिम फेरीचे तिकीट मिळवलं.

डेविड मिलरची सेमीफायनलमध्ये उत्तम खेळी

या सामन्यात दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) कर्णधार टेम्बा बावुमाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच खराब झाली. बावुमा 4 बॉल्समध्ये 0 रन करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर क्विंटन डी कॉकने 14 बॉल्समध्ये 3 रन्सची खेळी केली. याशिवाय अॅडम मार्करामही 20 बॉल्समध्ये 10 रन करून निघून गेला.

मात्र यानंतर डेविड मिलरने मोर्चा सांभाळला. हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी टीमला साथ दिली. दोघांनी महत्त्वपूर्ण खेळी खेळली, क्लासेनने 47 रन्स केले, तर डेव्हिड मिलरने 116 बॉल्समध्ये 101 रन्समध्ये शानदार खेळी केली. मिलरने अशा वेळी सेंच्युरी झळकावली जेव्हा टीमचे सर्व फलंदाज एकापाठोपाठ एक पॅव्हेलियनमध्ये परतत होते. या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 10 विकेट्स गमावून 212 रन्स केले.

कर्णधार टेम्बा बावुमाची ही चूक पडली महागात

दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने कर्णधार टेम्बा बावुमाने मोठी चूक केली. या सामन्यात त्याने स्पिनर गोलंदाजांना उशीरा गोलंदाजी दिली. त्याने 7व्या ओव्हरमध्ये बॉल एडन मार्करामकडे सोपवला आणि त्याने पहिल्याच बॉलवर डेव्हिड वॉर्नरला क्लीन बोल्ड केलं. मात्र तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या विजयासाठी खूप उशीर झाला होता. त्यामुळे टेम्बा बावुमाच्या या चुकीने दक्षिण आफ्रिकेवर पराभवाची नामुष्की ओढावली.