Virat Kohli: किंग कोहलीने खरंच बेईमानी केली? क्रिकेटचा नियम काय सांगतो? वाचा सविस्तर...

Fake Fielding, cricket rulebook: बांग्लादेशचा विकेटकीपर फलंदाज नुरुल हसन यानं भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान विराट कोहलीवर 'फेक फिल्डिंग' (Fake Fielding) केल्याचा आरोप केलाय.

Updated: Nov 3, 2022, 04:26 PM IST
Virat Kohli: किंग कोहलीने खरंच बेईमानी केली? क्रिकेटचा नियम काय सांगतो? वाचा सविस्तर... title=
Virat Kohli Fake Fielding cricket rulebook

Virat Kohli, Fake Fielding: भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात खेळलेल्या गेलेल्या 35 व्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा 5 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 ओव्हरमध्ये 6 बाद 184 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना बांग्लादेशचा संघ 16 ओव्हरमध्ये  6 बाद 145 धावाच करू शकला. पावसामुळे ओव्हर लिमिट कमी करण्यात आल्या होत्या. मात्र, मॅचनंतर चर्चाचा विषय ठरला तो विराट कोहली...

बांग्लादेशचा विकेटकीपर फलंदाज नुरुल हसन यानं भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान विराट कोहलीवर 'फेक फिल्डिंग' (Fake Fielding) केल्याचा आरोप केलाय. त्यासाठी बांग्लादेशच्या संघाला दंड म्हणून पाच धावा मिळायला हव्या होत्या, असंही नुरुलनं (Nurul hasan) म्हटलंय. त्याच्या या आरोपानंतर मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

नेमकं काय झालं?

बांग्लादेशची फलंदाजी सुरू होती. सामन्यातील 7 व्या ओव्हरला हा प्रकार घडला. बांग्लादेशचे फलंदाज धुवांधार फलंदाजी करत होते. डीप ऑफ साईडला मारलेला चेंडू अर्शदीप सिंहने स्टाईक एन्डला थ्रो केला. त्यावेळी पाँईटला थांबलेल्या विराट कोहलीने बॉल आपल्याकडे असल्याचं दाखवून नॉन स्टाईक एन्डच्या दिशेने बॉल थ्रो केला. त्यावरून हा सर्व वाद पेटला आहे.

पाहा व्हिडीओ- 

क्रिकेटचा नियम काय सांगतो?

क्रिकेटच्या 41.5 नियमानुसार (Cricket Rulebook), खोटं क्षेत्ररक्षण किंवा मैदानावर केलेलं असं कोणतंही कृत्य जे खेळाच्या नियमांच्या विरुद्ध आहे, अंपायरने तो चेंडू डेड बॉल म्हणून घोषित करण्याची तरतूद आहे आणि संघावर पण 5 धावा पेनल्टी म्हणून टाकल्या जाऊ शकतात. 

आणखी वाचा- T20 World Cup: सेमीफायनलमध्ये कोणाशी भिडणार Team India? पाकिस्तान-आफ्रिका सामन्यानंतर असं असेल गणित

दरम्यान, बांग्लादेशचं टी-ट्वेंटी क्रिकेटमधील (T20 World Cup) आव्हान संपुष्टात आलंय. त्यामुळे बांग्लादेश रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप भारतीयांनी केलाय. बांग्लादेश 5 धावांनी पराभूत झालाय. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी बांग्लादेशनी ही मागणी केल्याची चर्चा आहे. आयसीसीने 2017 मध्ये फेक फिल्डिंगचा नियम लागू केला होता. मात्र, या नियमाचा वापर केला गेल्याचं दिसून आलं नाही.