T20 World Cup: सेमीफायनलमध्ये कोणाशी भिडणार Team India? पाकिस्तान-आफ्रिका सामन्यानंतर असं असेल गणित

आज पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका (PakvsSa) असा सामना सुरु आहे. दुसरीकडे सेमीफायनलमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाचा मुकाबला कोणाशी होणार आहे हा प्रश्न आहे.

Updated: Nov 3, 2022, 03:46 PM IST
T20 World Cup: सेमीफायनलमध्ये कोणाशी भिडणार Team India? पाकिस्तान-आफ्रिका सामन्यानंतर असं असेल गणित title=

T20 World Cup: ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) भारताने जवळपास सेमीफायनलचं तिकीट निश्चित केलंय. तर आज पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका (PakvsSa) असा सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना करो या मरोच्या स्थितीत आहे. तर पाकिस्तानची टीम आधीच वर्ल्डकपच्या बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. अशाच परिस्थितीत जर पाकिस्तानचा पराभव झाला तर वर्ल्डकपचे दार त्यांच्यासाठी पूर्णपणे बंद होणार आहेत. तर दुसरीकडे सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा (Team India) मुकाबला कोणाशी होणार आहे हा प्रश्न आहे.

सेमीफायनलमध्ये भारत कोणाशी लढणार?

टीम इंडिया सध्या ग्रुप 2 मध्ये अव्वल स्थानावर आहे. टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्धचा शेवटचा सामना जिंकली तर 8 पॉईंट्सह ग्रुप-2 मध्ये अव्वल स्थानी राहून उपांत्य फेरीत पोहोचेल. टीम इंडियाचा सेमीफायनल सामना अॅडलेडमध्ये ग्रुप 1 च्या दुसऱ्या क्रमांकाच्या टीमसोबत होणार आहे. त्यामुळे हा सामना सामना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाचा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय.

पॉईंट्स टेबलची सध्याची परिस्थिती

सध्या 6 पॉईंट्ससह टीम इंडिया अव्वल स्थानी असून त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची टीम आहे. त्यांचे 5 पॉईंट्स आहेत. बांगलादेश 4 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वे 3 पॉईंट्ससब चौथ्या क्रमांकावर आहे आणि त्यानंतर पाकिस्तान संघ पाचव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने आतापर्यंत एकच सामना जिंकला आहे.

पाकिस्तानचा टीम आज हरली तर

आजचा सामना पाकिस्तान हरली तर दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये जाईल. नेदरलँडविरुद्धचा त्यांचा सामना जिंकल्यास ते 9 पॉईंट्ससह अव्वल ठरतील. अशात, झिम्बाब्वेविरुद्धचा शेवटचा सामना जिंकणारी टीम इंडिया ग्रुप 2 मध्ये दुसऱ्या स्थानावर राहून 8 पॉईंट्ससह सेमीफायनलमध्ये पोहोचेल. त्यानंतर टीम इंडियाचा सेमीफायनल सामना सिडनीमध्ये ग्रुप 1 मधील टॉपर टीमशी होईल आहे. यामध्ये न्यूझीलंडशी सामना होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान आज जिंकली तर

दक्षिण आफ्रिका नेदरलँड्सविरुद्धचा पुढील सामना जिंकून त्यांच्या ग्रुप 7 पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानावर मिळवून सेमीफायनलसाठी पात्र ठरू शकतो. आफ्रिकेने त्यांचा शेवटचा सामना गमावल्यास, तसंच पाकिस्तान टीमने बांगलादेशविरुद्धचा शेवटचा सामना जिंकवा तर तो 6 पॉईट्ससह दुसऱ्या क्रमांकावर पात्र ठरेल.